Chhatrapati Sambhajinagar : 24 तासांमध्ये मस्ती उतरवत गुडघ्यावर टेकवला; प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा पोलिसांनी उतरवली
Chhatrapati Sambhajinagar : शहरात सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावणाऱ्या प्रसिद्ध बिल्डरच्या श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये उतरवलीय.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत कारने जाणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावणाऱ्या प्रसिद्ध बिल्डरच्या श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये उतरवलीय. कुणाल बाकलीवाल (Kunal Bakliwala) असं पोलिसांना धमकी देणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा एक व्हिडीओ काल (दि.26 जानेवारी) सकाळच्या सुमारास व्हायरल झाला होता. हिंदीतून 'तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या' असे म्हणत शिवीगाळ करुन चक्क त्याने पोलिसांनाच (Police) सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली होती. परिणामी पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवालची श्रीमंतीची नशा उतरवली आणि 24 तासांमध्ये पोलिसांनी कुणालची मस्ती उतरवत त्याला गुडघ्यावर टेकवलाय.
नेमकं घडलं काय होतं?
राज्यात सुसाट गाड्या चालवणाऱ्यांची कमी नाही. त्यात सिग्नल तोडून सायरन वाजवत अनेकजण सर्रास फिरताना दिसतात. वाहतूकीचे नियम फाट्यावर मारत 'आपलंच राज्य' अशा आर्विभावात वावरणारेही खूप आहेत. असाच एक प्रकार काल 26 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर शहरात बघायला मिळाला. प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवाल याने पोलिसांसोबत हुज्जत घालत काळ्या आलिशान गाडीतून शिवीगाळ करुन चक्क पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी दिली. पोलिसांनी जाब विचारला असता त्याने गाडीतून खाली उतरण्याचे कष्टही न घेता 'पोलीस' या पदाला कचरा असल्याप्रमाणे वागवत धमकावण्यापर्यंत मजल गेली. 'तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या' असे म्हणत शिवीगाळ केली होती.
त्यानंतर पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने, "साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो," अशी धमकी दिली. गाडीतूनच माजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितलं होतं. याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल होता. मात्र, हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. "जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का?" असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता. दरम्यान, पोलिसांनी या बाकलीवाल आता ताब्यात घेतलंय.
हे ही वाचा