HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! चक्क उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांच्या हातात; गडचिरोलीच्या मुलचेरा येथील धक्कादायक प्रकार
Gadchiroli News : बारावीच्या हिंदी विषयाच्या पेपरला चक्क उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या मुलचेरा येथील एका परीक्षा केंद्रावर उघड झाला आहे.

गडचिरोली : सध्या बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Exam) कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून कॉपी करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत. असे असले तरी बारावीच्या हिंदी विषयाच्या पेपरला चक्क उत्तरे (Copy) लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या (Gadchiroli News) मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर उघडकीस आला आहे. मुख्यबाब म्हणजे शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाने दिलेल्या भेटीत हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या सुचनेनुसार केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला दिले आहेत.
सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कारवाईचा बडगा
पुढे आलेल्या माहितीनुसार, शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून एस. वाय. पथाडे तर पर्यवेक्षक एम. एम. खोब्रागडे कर्तव्यावर होते. पेपर सुरु असताना शिक्षणाधिकारी भुसे यांच्या पथकाने भेट दिली असता 18 पैकी 14 विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर शिसपेन्सिलने उत्तरे लिहिलेली आढळली, तर काहींची उत्तरे खोडलेली दिसून आले. सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय सचिवांना अहवाल पाठवला. त्यानंतर विभागीय सचिवांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संस्थेला पत्र लिहून संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
यंत्रणेचा दोष आणि विद्यार्थ्यांच्या मस्तकी, शिक्षक भारती संघटनेचा विरोध
उच्च माध्यमिक बोर्ड बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाच्या मंडळाच्या सचिवांनी परिपत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षेला परीक्षार्थी जर परीक्षा केंद्रावर कॉपी आणि गैरप्रकार करताना आढळलं तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू, असे शिक्षण विभागाच्या मंडळींनी म्हटले आहे. कायद्याच्या अनुषंगाने हा प्रकार शिक्षण विभागाने पुढे आणला आहे. मात्र शिक्षक भारती संघटनेने या परिपत्रकाचा विरोध दर्शविला आहे. कायदा 1982 पासून असल्याने आतापर्यंत अनेक असे प्रकार परीक्षा केंद्रावर झालेले आहे. त्यामुळे असे किती फौजदारी गुन्हे दाखल केले आहे.
विद्यार्थ्यांना अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्याची स्थिती शिक्षण विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये निर्भयपणे परीक्षा कशा होतील याचा विचार शिक्षण विभागाने घ्यावा. यात बोर्डालाच माहिती आहे की कोणत्या परीक्षा केंद्रावर कॉप्या केल्या जातात, अशा केंद्रांना बंद करा आणि अशा केंद्रावर जास्तची यंत्रणा लावा, म्हणजे यंत्रणेचा दोष आणि विद्यार्थ्यांच्या मस्तकी मारायचा हा प्रकार कुठेतरी थांबवला पाहिजे, याचा विरोध शिक्षक भारती संघटनेकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

