एक्स्प्लोर

HSC Exam: 12वीच्या दुसऱ्या पेपरलाही कॉपी बहद्दरांचा सुळसुळाट; परभणीत शिक्षणाधिकाऱ्याची 11 जणांवर कारवाई

परभणीत 12वीच्या हिंदीच्या पेपरला ही कॉपी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परभणीच्या झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर अकरा कॉपी-बहाद्दरांना शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी पकडले आहे.

परभणी : राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेला (Exam) काल(11 फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली. दरम्यान परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला  राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची (Copy) प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्र्यांनी ही या संदर्भात कठोर अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

अशातच,  आज (12 फेब्रुवारी) हिंदीच्या पेपरला ही कॉपी (Copy) झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परभणीच्या झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर अकरा कॉपी-बहाद्दरांना शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी पकडले आहे. दरम्यान, या कॉपी करणार्‍यांवर कारवाई सुरू असून याच सेंटरवर संबर येथील महाविद्यालयाच्या 108 विद्यार्थ्यांनी थेट पेपरलाच दांडी मारल्याचा प्रकारही समोर आला आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉप्यांचा पुरवठा

बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिक्षण विभागाकडून कॉपी रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत बीडमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आहे. बारावीच्या काल पहिला पेपर होता आणि याच पेपर साठी बीड शहरातील बलभीम महाविद्यालयासह इतर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आली. बीड शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला रोख लावण्याचा प्रयत्न करत चोप दिला आहे.

परीक्षा बोर्डाच्या ढिसाळ कारभाराने 160 विद्यार्थ्यांना फटका

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात 12वीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी बोर्डाच्या कारभाराने 160 विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. यात 400 आसनव्यस्थेची क्षमता असलेल्या ठवरे महाविद्यालयात 560 विद्यर्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.  यातील मुख्य परीक्षा केंद्रावर जागा नसल्याने 160 अतिरिक्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपकेंद्र  दिले गेले. मात्र याची विद्यार्थ्यांना कल्पनाच नव्हती. 10 वाजता परीक्षा केंद्रवार पोहचल्यानंतर बाजूला असलेली न्यू अपोप्सटोलीक शाळा हे 160 विद्यार्थ्यांचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्थाप सहन करावा लागला. नंतर यात परीक्षा बोर्डाची चूक असल्याचे लक्षात आले.

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget