Grafting Method : एका रोपात घ्या तीन प्रकारच्या भाज्या, काय आहे ग्राफ्टिंग? कोणकोणत्या प्रकारे ग्राफ्टिंग करता येते?
Grafting For Plants : आता तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी आता एकाच रोपात तीन प्रकारची पिके घेऊ शकतील. या टेक्निकचे नाव आहे 'ग्राफ्टिंग' (कलम कलम करणे/प्रत्यारोपण). या पद्धतीचा वापर करुन तुम्ही कमी जागेत अनेक पिके घेऊ शकता.
Grafting For Plants : कृषीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे तंत्रज्ञात जसे बदलले तसे शेतीत देखील आधुनिकीकरण केले जाते. कमी जागेत अधिक पिके घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. आता तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी आता एकाच रोपात तीन प्रकारची पिके घेऊ शकतील. या टेक्निकचे नाव आहे 'ग्राफ्टिंग' (कलम कलम करणे/प्रत्यारोपण). या पद्धतीचा वापर करुन तुम्ही कमी जागेत अनेक पिके घेऊ शकता. सध्याच्या घडीला बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे. परिणामी याचा मोठा परिणाम बाजारपेठांसोबतच शेतकऱ्यांवर होतो. अशा कठीण परिस्थितीत भाजीपाला पिकवण्याकरता ग्राफ्टिंग पद्धतीचा वापर केल्यास भाजीपाल्याची वाढती मागणी तर भागवता येतेच, शिवाय कमी जमिनीवर अनेक पिके घेऊन शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळू शकतो. तसेच आता उच्चशिक्षित तरुणही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती क्षेत्रात येत आहेत. विविध कृषीविद्यालयात प्रवेश घेऊन शेती विषयक संशोधनात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्याही आता वाढत आहे. अशा विद्यार्थांकडून शेतीत अनेक नवीन प्रयोग केले जात असतात.
काय आहे ग्राफ्टिंग? (कलम कलम करणे/ प्रत्यारोपण) (What Is Grafting)
यामध्ये दोन किंवा तीन रोपे हे तिरकस पद्धतीने कापले जातात. ही कापलेली रोपे एकत्र जोडली जाताता. त्यांना एका टेपच्या साहाय्याने बांधले जाते. यानंतर ही झाडे संपूर्ण 24 तास अंधारात ठेवली जातात. जेणेकरुन झाडे एकमेकांत मिसळतात. नंतर कलम केल्यानंतर 15 दिवसांनी रोपे शेतात किंवा कुंडीत लावली जातात. तथापि, झाडांच्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी लावल्या जातात. जेव्हा या बिया झाडांचे रुप घेतात. त्यावेळी ग्राफ्टिंग केले जाते.
ग्राफ्टिंग (कलम कलम करणे/ प्रत्यारोपण) किती प्रकारे केले जाऊ शकते?
कट ग्राफ्टिंग, क्लेफ्ट ग्राफ्टिंग, क्राऊन ग्राफ्टिंग, स्प्लाईस ग्राफ्टिंग, जीभ ग्राफ्टिंग, ऍप्रोच ग्राफ्टिंग.
या गोष्टींची घ्या काळजी (How To Take Care Of Plants)
जर एखाद्या शेतकऱ्याला हवे असेल तर तो एका दिवसात 5000 ते 6000 रोपांची कलमे करु शकतो. ज्यामध्ये 15 ते 20 दिवसांनी कलम करुन रोपे शेतात लावली जातात. शेतात रोप लावल्यानंतर पिकाला आवश्यकतेनुसार पाणी व खते दिली जातात. त्याचबरोबर पिकाची
वेळोवेळी छाटणी करणे देखील आवश्यक आहे. कलम तंत्राने पिकात कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि अशाप्रकारे पाणी साचलेल्या भागात पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरते.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI