(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मिशन लोकसभा! उद्धव ठाकरे दोन दिवसीय हिंगोली दौऱ्यावर, चार सभा घेणार
Uddhav Thackeray In Hingoli : कोकण, छत्रपती संभाजीनगरनंतर (Chhatrapati Sambhaji Nagar) आता उद्धव ठाकरे दोन दिवसीय हिंगोली (Hingoli ) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
Uddhav Thackeray In Hingoli : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कामाला लागले असून, मागील काही दिवसांपासून त्यांनी सभांचा धडका लावला आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगरनंतर (Chhatrapati Sambhaji Nagar) आता उद्धव ठाकरे दोन दिवसीय हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 23 आणि 24 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हिंगोलीत असणार असून, या दौऱ्यात त्यांच्या एकूण चार सभा होणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या याच दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी मिशन लोकसभा हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे 23 आणि 24 फेब्रुवारीला हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे एकूण चार सभा घेणार आहेत. याच सभेतून ते कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे. तसेच, महायुतीच्या उमेदवारांना मदत करण्याचे देखील आवाहन करू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची हिंगोली जिल्ह्यातील ही पहलीच सभा असल्याने ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...
- 23 फेब्रुवारीला सेनगाव आणि कळमनुरी या ठिकाणी सभा असणार आहे.
- सेनगाव येथे 4:15 वाजता सभा होणार असून, कळमनुरी येथे 6:15 वाजता सभा होणार आहे.
- 23 फेब्रुवारीला संध्याकाळी उद्धव ठाकरे यांचा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्काम असणार आहे.
- दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारीला उमरखेड येथे सकाळी 11:30 वाजता सभा होणार आहे.
- त्यानंतर 2 वाजता वसमत येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
हिंगोली मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणार?
मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा सुरु आहे. ज्यात मराठवाड्यातील आठही जगांवर देखील चर्चा झाली आहे. ज्यात फक्त हिंगोली लोकसभा मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. कारण सर्वच पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. अशात उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवस दौरा करून चार सभा घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अप्रत्यक्षरीत्या हिंगोली लोकसभेच्या जागेवर दावा करतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून हिंगोलीवर दावा करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेस देखील ही जागा ठाकरे गटाला सोडू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या :
मराठवाड्यात मराठा आंदोलन तापलं, परभणी-हिंगोलीत दोन दिवसांत 4 हजार 800 बस फेऱ्या रद्द