एक्स्प्लोर

Hingoli Farmers : हिंगोली जिल्ह्यातील संपावर असलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं होते. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.

Hingoli Farmers Agitation : मुसळधार पावासामुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहे. हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर राज्य शासनानं नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचं जाहीर केलं. पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावं लागलं आहे. त्यामुळं गेल्या सहा दिवसापासून शेतकरी गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज संपावर असलेले शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

40 ते 45 गावातील शेतकरी मदतीपासून वंचित

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतू या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळं या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळं गेल्या सहा दिवसापासून गोरेगाव येथील सर्व शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य शासनानं अद्यापही या संपाची दखल घेतली नाही. त्यामुळं गोरेगावमधील शेतकरी आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करावा. तसेच तत्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी  केली आहे.


Hingoli Farmers : हिंगोली जिल्ह्यातील संपावर असलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

अतिवष्टीचा शेती पिकांना मोठा फटका, आजही राज्यात पावसाचा अंदाज

दरम्यान, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget