Apple Farming : हिंगोली जिल्ह्यात चक्क सफरचंदाची शेती, यंदा 10 क्विंटल उत्पादन निघण्याचा अंदाज
Apple Farming : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यामध्ये सफरचंदाची (Apple farming) यशस्वी शेती केली जात आहे. सुखळी गावातील पुरुषोत्तम कुटे या शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे.
Apple Farming : मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) जिल्ह्यामध्ये सफरचंदाची (Apple farming) यशस्वी शेती केली जात आहे. जिल्ह्यातील सुखळी गावातील पुरुषोत्तम कुटे या शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. कुटे यांनी दोन एकरमध्ये 200 सफरचंदाच्या झाडांची लागवड केली आहे.
हिंगोली जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील विकसित नसलेल्या शेतीमुळं शेतकऱ्यांचे होणारे हाल हीच परिस्थिती जवळपास सगळीकडे पहायला मिळते. परंतू याच हिंगोली जिल्ह्यातील सूखळी इथं चक्क सफरचंदाचं उत्पादन घेतलं जात आहे. सेनगाव तालुक्यातील सूखळी येथील रहिवाशी असलेल्या पुरुषोत्तम कुटे या शेतकऱ्याने प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न म्हणून दोन एकरमध्ये असलेल्या संत्र्याच्या बागेत आंतरपीक म्हणून दोन वर्षापूर्वी संफरचंदाची लागवड केली होती.
HR 99 या प्रजातीच्या झाडांची लागवड
पुरुषोत्तम कुटे यांनी उत्तराखंडमधून HR 99 या प्रजातीची 200 रोपटी विकत आणली होती. या प्रजातीचे रोपटे 40 °c इतक्या तापमानातही तग धरुन उत्पादन देऊ शकतात. हे या रोपट्याचे वैशिष्ट्य आहे. त्या रोपट्याची लागवड 8 बाय 10 इतक्या अंतरावर करण्यात आली आहे. अगोदर शेतात संत्र्याची बाग असल्यानं या झाडांच्या वाढीला मदत झाली. ही बाग लागवड करुन आता दोन वर्ष पुर्ण झाली आहे.
यावर्षी 10 क्विंटल इतके उत्पन्न निघेल असा अंदाज
यावर्षी पहिल्यांदाच सफरचंदाच्या झाडांनी फळ धारणा केली आहे. ही बाग लहानाची मोठी करत आसाताना आत्तापर्यंत जवळपास एक लाख रुपये इतका खर्च आला आहे. पहिले वर्ष आसल्यानं झाडांची व्यवस्थित छाटणी झाली नाही. शिवाय कोणतीही फवारणी किंवा इतर कोणतेही खते झाडांना दिली नाहीत. तरीही यावर्षी 10 क्विंटल इतके उत्पन्न निघेल असा अंदाज शेतकरी सांगत आहेत. तर पुढील वर्षी बागेची जास्त काळजी घेऊन जास्त उत्पादन घेऊ असा विश्वास शेतकरी पुरुषोत्तम कुटे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Tomato Price : सफरचंद, पेट्रोल मागे पडलं, 'अब की बार' टोमॅटो पोहोचले प्रतिकिलो 'दीडशे पार', नाशिकमध्ये आजचा दर काय?