Satara News : हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती
Satara : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

Heavy Rains in Himachal : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्यामुळे पर्यटनासाठी फिरण्यास गेलेले महाराष्ट्रातील काही पर्यटक या पूर परिस्थितीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अजूनही प्रशासनाकडून कोणताही या घटनेला दुजोरा दिला नसून यामधून कोणतीही पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोमवारी (30 जून) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही इमारती कोसळल्या असून अनेक भागात भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झालेत. अशातच, पावसाळ्यापासून आतापर्यंत राज्यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी सकाळी हिमाचलच्या मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ भूस्खलन झाले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहने बोगद्यातही अडकली आहेत. सतर्कतेमुळे आज हिमाचलच्या 4 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत.
दुसरीकडे, बिहारमधील भोजपूर, बक्सर आणि नालंदा येथे वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी रविवारी गया येथील इमामगंज येथील लागुरही धबधब्यात अचानक पाणी वाढले. जोरदार प्रवाहात 6 मुली वाहून गेल्या. स्थानिक लोकांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस पडेल. उत्तराखंड आणि झारखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेश-राजस्थानसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर 17 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
शिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर 5 ठिकाणी भूस्खलन
दरम्यान, सततच्या पावसामुळे शिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर पाच ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामुळे वाहतूक एकाच लेनमध्ये वळवण्यात आली, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. सोलन जिल्ह्यातील कोटी जवळील चक्की मोर येथील महामार्गावरही अशीच परिस्थिती होती, जिथेही रस्त्यावर दगड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना एकाच लेनमध्ये हळू गाडी चालवावी लागली. सोलनच्या डेल्गी येथे भूस्खलनामुळे सुबाथू-वाकनाघाट रस्ता देखील बंद करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासन रस्ता पूर्ववत करण्यात व्यस्त आहे. सोलनचे उपायुक्त मनमोहन शर्मा यांनी चक्की मोडची पाहणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या























