एक्स्प्लोर
Advertisement
ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव
कोल्हापूर : कोल्हापूरपासून 24 किलोमीटरवर असलेल्या पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव म्हणजे समस्त हातकणंगले तालुक्याचं दैवत. धनगर साम्राज्याचं हे देवालय असलं तरी बारा बलुतेदारांना येथे वर्षभरातल्या उत्सवांमध्ये मान असतो. त्यामुळे इथ सर्व धर्मातील भाविक नित्यनियमाने पुजेसाठी दाखल होतात.
पट्टणकोडोलीतील बिरदेव यात्रा ज्या मंदिर परिसरात भरते ते मंदिर पुरातण काळातील असून सुरुवातीला इथे लहान आणि चौकोणी अकारातील होतं. सध्या मूळ गाभाऱ्यात श्री. बिरदेवाची मूर्ती असून गाभाऱ्याबाहेरच्या जागेत मोठे बदल आणि विस्तार करण्यात आला आहे.
मंदिर परिसरात भव्या तीन मजली मंडप बांधण्यात अला असून यात्रा काळात भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भाविक तेथे जमतात. यात्रा काळात देशभरातून 8 लाख भाविक दाखल होतात, तर वर्षभर 10 लाखांपेक्षा जास्त भाविक मंदिरात येतात. पट्टणकोडोलीत बिरदेव कसे आले, याची एक अख्यायिका आहे.
दरवर्षी पट्टणकोडोलीत श्री. बिरदेवाची ऐतिहासिक यात्रा भक्तांच्या अलोट गर्दीत उत्साहात भरते. ढोल, कैताळाचा निनाद, छत्र्या, बाशिंग आणि तोरणांच्या महिरिपीत, अब्दगिरीच्या छायेत, विठ्ठल बिरदेव नामाच्या गजरात आणि भंडारा, खोबरे,लोकरीच्या मुक्तहस्त उधळणीने श्री विठ्ठल-बिरदेवाच्या महायात्रा सोहळ्यास भक्तिमय वातावरणात सुरुवात होते.
या यात्रेचे मुख्य आकर्षण अंजनगावचे फरांडे महाराज श्री खेलोबा राजाभाऊ वाघमोडे यांची भाकणूक (भविष्यवाणी) असते. यात्रेच्या मुख्य दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथील फरांडे महाराजांनी केलेली देववाणी (भाकणूक) ही आगामी काळातील घडामोडीचे अचूक भाकित सांगणारी आणि मार्गदर्शन करणारी असते.
गाभार्यासमोरील मानाच्या दगडी गादीवरुन उठून हेडाम नृत्य करत फरांडेबाबा दर्शनासाठी येतात. यावेळी भंडार्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात येते. फरांडे महाराज अर्थात खेलोबा राजाभाऊ वाघमोडे हेडाम खेळत पोटावर तलवारीने वार करुन घेत श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात येतात. यात्रा काळात फरांडे महाराजांच्या आगमनापासून पट्टणकोडोली नगरीत ढोल-कैताळाच्या गजरात ठिकठिकाणी धनगरी ओव्यांच्या गायनाचा कार्यक्रम सुरु असतात, बिरदेवी यात्रेत देशभरातील धनगरसमाज्यातील भाविक पट्टणकोडोलीत दाखल होतात, तर काही जण दरवर्षी आपले ढोल पथक घेऊन दाखल होतात, त्याचबरोबर गजी नृत्याची पथकं देखील मंदिरात येऊन आपली पारंपरिक कला सादर करतात.
पट्टणकोडोलीतील बिरदेव यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक नगरीत दाखल होत असतात. मंदिर परिसरात देशातील सर्वात मोठा घोंगड्याचा बाजार भरतो.
भंडाऱ्याच्या उधळणीने झळाळी प्राप्त झालेल्या सोन्याच्या पट्टणकोडोलीतील बिरदेवाची यात्रा पाहण्यासारखी असते. सामान्य भक्ताच्या हाकेला धावून जाणाऱ्या श्री बिरदेवाच्या गावी अर्थाच पट्टणकोडोलीत जायलाच हवं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement