Gondia : मृत शिक्षकाला दिले परिक्षेचे काम, संबंधित शाळेने माहिती देऊन सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा, गोंदिया जिल्ह्यातील प्रकार
Gondia : मृत शिक्षकाला दिले परिक्षेचे काम, संबंधित शाळेने माहिती देऊन सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा, गोंदिया जिल्ह्यातील प्रकार

Nagpur : सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावाने नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले आहेत. संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळविल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले आहे. त्यामुळे बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे.
शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अधिकची माहिती अशी की, दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठविले जाते. यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश
दरम्यान, शिक्षक मिलिंद पंचभाई यांच्या निधनाला सहा महिने लोटले. संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रितसर पाठविली आहे. तसेच यादीत मिलिंद पंचभाई यांचे नाव पाठविले नव्हते, असे असताना सुद्धा दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठविले आहे. हे आदेश प्राप्त होता शाळेला सुध्दा प्रश्न पडला असून बोर्डाच्या अजब कारभाराचा नमुना पुढे आला आहे.
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?#AkshayShinde #BadlapurSchoolCase #HighCourthttps://t.co/gUJant6pcP
— ABP माझा (@abpmajhatv) February 6, 2025
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?#AkshayShinde #BadlapurSchoolCase #HighCourthttps://t.co/PcKhtTANAp
— ABP माझा (@abpmajhatv) February 6, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या























