Gondia Crime News : क्रीडा शिक्षकाचे शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालकांकडून संताप, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बंड पाडला
Gondia Crime News : शाळेतील क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात घडलाय.
Gondia Crime News : गोंदियाच्या तिरोडा येथील शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या क्रीडा शिक्षकांच्या विरोधात पालकांनी संताप व्यक्त केलाय. तिरोडा शहरातून शाळेवर मोर्चा काढत पालकांनी शाळेतील प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवाय शाळेत सुरु असलेला स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पालकांनी बंद पाडलाय. दरम्यान, त्या क्रीडा शिक्षकाला अटक केल्यानंतरच शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घ्या, अशी मागणी पालकांनी केली आहे...
अधिकची माहिती अशी की, गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षकाने एका विद्यार्थिनीची अश्लील चाळे केले होते. याप्रकरणी क्रीडा शिक्षकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला... मात्र, आज त्याच शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पालकांनी आधी त्या क्रीडा शिक्षकाला अटक होऊ द्या त्यानंतरच स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घ्या अशी मागणी केली. त्यापूर्वी पालकांनी तिरोडा शहरातून मोर्चा काढला व शाळा प्रशासनाच्या निषेध नोंदविला. त्यानंतर शाळेत सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी जात मुख्याध्यापकांसह शाळा प्रशासनाचा घेराव घातला. एका विद्यार्थिनीवर अत्याचार झालेला आहे. त्यामुळे आधी त्या आरोपी क्रीडा शिक्षकाला अटक व्हायला पाहिजे, असे म्हणत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बंद पाडला. तसेच शाळा प्रशासनाने त्या शिक्षकाला निलंबित केले आहे. मात्र त्याला किती दिवसांसाठी निलंबित केले याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासन मिळावे व सेवेतून त्या शिक्षकाला बडतर्फ करा अशी मागणीही पालकांनी केली....
बाप लेकाकडून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या घडली आहे. उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी बाप लेकाला पोलिसांनी दोघांनीही पोलिसांनी ठोकला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर हे नराधम याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब समोर आली आहे.
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे लातूरमध्येही घबाड, कोट्यवधी किंमत असलेली पाच एकर जमीन नावावरhttps://t.co/RSoEC7skhU#SantoshDeshmukh #Beed #WalmikKarad #SIT #DhananjayMunde #parli
— ABP माझा (@abpmajhatv) January 23, 2025
इतर महत्वाच्या बातम्या