एक्स्प्लोर

Election Result 2022 : उत्पल पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला; पणजीची बाजी मारणार का? आज फैसला

Election Result 2022: भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक लढवली. आता ते पणजीची बाजी मारणार का याचा फैसला आज होणार आहे.

पणजी: गोव्यासोबतच संपू्र्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर बाजी मारणार की भाजप त्यांच्यावर वरचढ ठरणार हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला आणि अपक्ष निवडणूक लढवली. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. 

पणजी गोव्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी देखील राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ. पण या मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रिकरांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात यांचे तिसवाडी तालुक्यातील तालीगांव, साताक्रुझ, सातआंद्रे या ठिकाणी समर्थक आमदार आहेत. शिवाय, मोठ्या संख्येनं असलेल्या कॅथलिक मतदारांचा असलेला पाठिंबा ही देखील त्यांच्या जमेची बाजू. केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 

भाजपने चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले; पर्रिकरांचा आरोप
या भागातून भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे ते डिफॉल्टर आहेत. त्यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात काम केले आहे. येथील मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचे काम करायचे नाही. त्यांच्यावर बलात्कार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी राजीनामा देताना पक्षाला सांगितले होते की, या जागेवर चांगला उमेदवार द्या, मी घरी जाईन, असं उत्पल पर्रिकर म्हणाले होते. 

बहुमतासाठी 21 जागांची गरज
गोव्यात विधानसभेच्या 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. 40 जागांसाठी गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. 

एक्झिट पोल काय सांगतोय?
एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून त्याला 13 ते 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 12 ते 16 जागा आणि आम आदमी पक्षाला 1 ते 5 जागा मिळू शकते. त्याचवेळी महाराष्ट्र गोमंतवादी पक्षाला 5 ते 9 जागा मिळण्याची शक्यता असून हाच पक्ष किंगमेकरची भूमिका बजावण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget