एक्स्प्लोर

Ganesh Utsav 2025: गणपतीच्या मंडपाला खड्डे खणले तर पालिकेकडून 15 हजारांचा दंड, मंगलप्रभात लोढा मदतीसाठी पुढे सरसावले, म्हणाले...

Ganesh Utsav 2025: मुंबईत यंदा मंडप उभारणीच्या वेळी गणेश मंडळांनी रस्त्यावर जर खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार 15 हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Ganesh Utsav 2025 मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच जसजसा हा सण जवळ येतो तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीला जोरात वेग आला आहे. मात्र, मुंबईत यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेचा (Mumbai Muncipal Corporation) नवा ‘दंड नियम’. गणेश मंडळांनी (Mumbai Ganesh Utsav 2025) रस्त्यावर जर मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावली नुसार 15 हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार आहे. मात्र या पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई 'अन्यायकारक' असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

तर दुसरीकडे या निर्णयाचा विरोध लक्ष्यात घेता जुन्या नियमानुसारच दोन हजार रुपये दंड आकारण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याचे मत मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भात महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या निर्णयावर विचार करू, असेही ते म्हणालेय.

पालिका आयुक्तांची भेट घेऊन निर्णयावर पुन्हा विचार करू - मंगलप्रभात लोढा

दरम्यान या नव्या नियमानुसार खड्याला 15 हजार दंड आकारण्यात येणार असल्याने मुंबईतील मंडळामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. हि नाराही दूर करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. या संदर्भात महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या निर्णयावर विचार करू, असेही आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. तसेच येत्या 10 दिवसात मुंबईतील आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे बुजवले जातील, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू

सगळ्यांचा आवडता 'श्रीगणेशोत्सव' महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून "महाराष्ट्राचा राज्य उत्सव" म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget