Gadchiroli News : गडचिरोली न्यायाधीश धमकी प्रकरण, निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक
Gadchiroli News : पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी 25 मे रोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली.
![Gadchiroli News : गडचिरोली न्यायाधीश धमकी प्रकरण, निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक Gadchiroli News Judge Threat Case Suspended Police Inspector Rajesh Khandve Arrested Gadchiroli News : गडचिरोली न्यायाधीश धमकी प्रकरण, निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/3f6a298c14d578f734dbdb111f9d61bf168586810164489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गडचिरोली : गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला (Gadchiroli News) पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान 20 एप्रिलच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी एन. डी. मेश्राम यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश 20 मे रोजी दिले होते. या आदेशानंतर संतप्त झालेले पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी 25 मे रोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली.
याप्रकरणी न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना अवगत केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार केली.त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी राजेश खांडवे यांना निलंबित करण्यात आले. नंतर खांडवे हे नागपूरला दवाखान्यात भरती होते. शुक्रवारी ते गडचिरोलीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
काय आहे प्रकरण?
चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी 21 एप्रिल ला चामोर्शी कृषिउत्पन बाजार समितीचे माजी सभापती नेते अतुल यांना बेदम मारहाणकेली होती. यात अतुल पवार यांचा हात फ्रॅक्चर तर मानेवर जखमा झाले होते. चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून घडला होता. खांडवे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंब झाला त्याविरोधात गण्यारपवार हे कोर्टात गेले. कोर्टानं खांडवेंविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याचा राग आल्यानं राजेश खांडवे यांनी गुरूवारी पहाटे 5 वाजता न्यायाधीशांच्या घरी जाऊन शिवीगाळ केला. त्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. राजेश खांडवे यांच्यावर 294, 324, 323, 42 भा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ग मनात ठेवून राजेश खांडवेंनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)