सेल्फी घेताना पाय घसरुन माजी रणजीपटू शेखर गवळी दरीत कोसळले, 16 तासांनी मृतदेह सापडला!
शेखर गवळी मंगळवारी काही मित्रांसह इगतपुरीजवळच्या एका डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेले होते. यावेळी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन शेखर गवळी खोल दरीत कोसळले.
नाशिक : महराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी नाशिक जिल्ह्यात घडली. माजी रणजीपटू महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी यांचा मृत्यू झाला. इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणात मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले असता सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला आणि ते 250 फूट खोल दरीत कोसळले. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला.
ट्रेकिंगसाठी गेले असताना काल संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या शेखर गवळी खोल दरीत कोसळले. काल त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र पाऊस आणि अंधार यामुळे बचाव आणि शोधकार्यात अडथळे येत होते. त्यानंतर आज पहाटे पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 16 ते 17 तासांनी त्यांचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात एका कपारीत आढळून आला.
माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, शोध सुरु
शेखर गवळी यांनी अनेक खेळाडू घडवले. शेखर गवळी यांनी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात वेगळी छाप सोडली आहे. उत्तम प्रशिक्षक, गिर्यारोहक, फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांची ख्याती होती. जे इतरांना गिर्यारोहणचे धडे देत होते, त्यांनाच सेल्फीचा मोह आवरला नाही आणि दुर्दैवाने त्यांचा पाय घसरला आणि मृत्यू झाला.
महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्यामुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.
Shekhar Gawli | माजी रणजीपटू शेखर गवळी इगतपुरीमध्ये दरीत कोसळले, 16 तासांनी मृतदेह सापडला!