![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, शोध सुरु
माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी हे इगतपुरी इथे ट्रेकिंगदरम्यान 200 फूट खोल दरीत कोसळले. शोध आणि बचावकार्य सुरु आहे.
![माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, शोध सुरु Former Ranji cricketer Shekhar Gawli fell in valley in Igatpuri, Nashik, search operation underway माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, शोध सुरु](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/02131616/Shekhar-Gawli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन ते 200 फूट दरीत कोसळले. काल (1 सप्टेंबर) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचं काम सुरु होतं. परंतु परिसरात गर्द अंधार असल्याने शोध आणि बचावकार्य थांबवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान आज पहाटेपासून पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झाली आहे.
शेखर गवळी यांनी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात वेगळी छाप सोडली आहे. त्यांना ट्रेकिंग, योगा, फिटनेस, व्यायामाचा छंद आहे. मंगळवारी ते काही मित्रांसह इगतपुरीजवळच्या एका डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन शेखर गवळी खोल दरीत कोसळल्याचं समजतं
यानंतर इगतपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह शोध सुरु केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवून मंगळवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरु केली जाईल, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. त्यामुळे या घटनेमुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)