एक्स्प्लोर

Indapur News : इंदापूरच्या तहसिलदारांवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला; राॅडने प्रहार डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न

तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला.

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा  हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला केल्यानंतर संशयित फरार झाले. कायदेशीर मार्गाने जाणार असून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे श्रीकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न  

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, नेहमीप्रमाणो मी इंदापूर प्रशासकीय भावनाकडे निघालो होतो. संविधान चौकात माझी गाडी आली तेव्हा चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी राॅडने त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी माझ्या गाडीत चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले, त्यांनी देखील आमच्यावर हल्ला चढवला. 

कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढला

दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. इंदापूर तहसील कार्यालयातील कामगारांनी काम बंद करत काळ्या फिती लावून तहसिल कार्यालयापासून पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. हल्ला केलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली. बारामतीमध्येही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तहसीलदार यांच्यावरील हल्ला झाल्यानंतर नाकाबंदी करत पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून एका आरोपीला ताब्यात घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Central Railway : मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, पण पाकिस्तानात नेमकी काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, पण पाकिस्तानात नेमकी काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
Embed widget