एक्स्प्लोर

Nagpur : आदिवासी शाळांत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली, कौशल्य विकसित होण्यासाठी होणार मदत

9 प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20,361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45,129 विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे.

नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय, भाषिक, आंतरवैयक्तिक तसेच निसर्गवादी बुद्धिमत्ता आदींमध्ये परिणामकारक बदल झाले आहे. विभागातील आदिवासी विकास विभागाच्या 75 शाळांमध्ये भविष्यवेधी शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज येथे दिली. शिक्षकांनी अध्यापन पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरुप वापर करुन ग्रुप लर्निंग, विषय मित्र, मोहल्ला वर्ग तसेच पिअर लर्निंगचा उपयोग करुन विभागाचा 'नवचेतना' उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मितीची गरज

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे भविष्यवेधी शिक्षण विचार या विषयासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते  बोलत होते. मनरेगा योजनेचे मास्टर ट्रेनर तथा शिक्षण तज्ज्ञ निलेश घुगे यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, शासकीय आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती अधिक प्रमाणात होण्यासाठी, अध्यापनाचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी शिकविण्याचे व शिकण्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पातळी व शिकण्याची गती ही वेगळी असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, अध्ययनाच्या अडचणी लक्षात घेऊन शिकविण्याच्या पध्दतीत बदल झाला पाहिजे. पारंपारिक पध्दतीपेक्षा हसतखेळत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची भिती घालवून शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास होणे आवश्यक आहे.

नवीन शिकण्याची वृत्ती निर्माण करा

सृजनशीलता, सहकार्य, सहानुभूती, सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी. यासाठी आश्रमशाळांच्या शिक्षकांनी अध्ययन, अनुभव, चिंतन व मननाचे नियोजन करावे. मुलांना स्वत:हून शिकण्यास प्रेरीत करावे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करुन त्याअनुषंगाने शिक्षकाने आपणास कमी लेखून त्यांच्याकडूनच सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडण्याचा प्रयत्न करावा, यामुळे ते स्वत: शिकून त्या विषयात निपूण होतील, असे ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निपूण भारत अभियान अंतर्गत राज्य शासनाव्दारे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पायाभूत साक्षरतेचे विविध शैक्षणिक घटक अंतर्भूत करण्यात आले आहेत.

या प्रणालीचा 20 हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

आदिवासी विकास विभागाव्दारे नवचेतना उपक्रम विभागाच्या सर्व शाळामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या नऊ प्रकल्पांतील 75 शासकीय आश्रमशाळांतील 20 हजार 361 व 138 अनुदानित आश्रमशाळांतील 45 हजार 129 विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शाळेच्या सर्व शिक्षकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात या प्रणालीच्या अंमलबजावणीचे यश दिसून येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget