एक्स्प्लोर

Collector : योजनांची फलनिष्पत्ती आवश्यक, जिल्हास्तरीय पीक विमा योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पावसाच्या दिवसात शेतकरी कामाला लागलेला आहे, त्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ त्वरेने देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

नागपूर : कृषी विभागाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. परंतु या योजनांची फलनिष्पत्ती  झाली किंवा नाही याबाबत  शेतकऱ्यांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. पावसाचे दिवसात शेतकरी कामाला लागलेला आहे, अशा वेळी त्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ त्वरेने देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी विमा कंपन्या व कृषी विभागाला  दिल्या. कर्ज योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभाग व विमा कपन्यांनी ग्रामीण भागात शिबीर घेवून जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात जिल्हास्तरीय आढावा  बैठकीत त्या बोलत होत्या. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, निलीमा भोयर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक,  मोहित गेडाम, विभागीय कृषी अधिकारी, तसेच  कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पीक कर्ज योजनेंची अंमलबजावणी करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात त्याबाबत जनजागृती करुन शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळायला हवा, विमा कंपन्यांनी तालुकास्तरावर कार्यालय स्थापन करुन शेतकऱ्यांना विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व योजनेचा लाभ दयावा.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामाबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी मागील वर्षात पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळाले किंवा नाही याबाबत तपासणी करण्यात आली का ? कर्जाचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याविषयी कृषी विभागाने आढावा घेतला काय ? याबाबत तत्काळ सर्वे करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शाश्वत शेती अभियानात फळपिक आधारित शेती पध्दतीत लाभार्थ्यांचा प्रतिसाद किती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का याबाबत विचारणा जिल्हाधिकारी यांनी केली. तसेच पशुधन आधारित शेती पध्दतीत शेतकऱ्यांना गायी व शेळी दिल्या आहेत. त्यांचा आढावा घेण्यात आला. केवळ योजना राबवून मोकळे होण्यात अर्थ नाही. योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, किड व रोगासारख्या अपल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण, सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येते, असे सांगितले. यावेळी योजनेच्या जोखीमेच्या बाबी, योजनेत  समाविष्ट पिके, खरीप हंगाम, रब्बी हंगाम, त्यातील पिकांचा विमा व योजनंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत कार्यवाही आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यात 1 हजार 128 लाभार्थी

जिल्ह्यात 1 हजार 128 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांची जनावरे सुस्थितीत आहेत काय, याबाबत जनावरांची तपासणी  करणे आवश्यक आहे. तरच योजनेची फलनिष्पत्ती साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.  दुग्ध उत्पादनात वाढ झाली काय याबाबत जाणीवपूर्वक तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासोबतच योजनेमुळे उत्पन्नात वाढ झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार करा, जेणेकरुन त्याचा फायदा अन्य शेतकऱ्यांना होईल. विविध योजनांची प्रसिध्दी ग्रामस्तरावर करुन जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
IND vs WI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget