एक्स्प्लोर

Nagpur : आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करा; मनपा आयुक्तांचे आवाहन

आपात्कालीन परिस्थितीत बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन केले जावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

नागपूर : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपात्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा नागरिकांच्या सुविधेसाठी सज्ज झालेली आहे. मात्र नागरिकांनीही नैसर्गिक आपात्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. पूर किंवा वज्राघात अर्थात वीज पडणे अशा परिस्थितीत बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जारी करण्यात आलेल्या नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले जावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

पूर परिस्थिती आणि वज्राघात अर्थात वीज पडणे या नैसर्गिक आपत्ती आहेत. मात्र या आपत्ती येण्यापूर्वी निसर्गाद्वारे संकेत दिले जातात. ते ओळखून आपणे सावध राहण्याची गरज आहे. अतिवेगवान वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना ही वज्राघात अर्थात वीज पडण्याच्या स्थितीची चेतावणी देणारी चिन्हे आहेत. वीज पडण्याबाबत काही संभ्रम किंवा भ्रामक कल्पना आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत. 

'या' बाबी लक्षात ठेवा
मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 किमी पर्यंत). वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यु पावतात. वज्राघात बाधीत किंवा जखमी व्यक्तीस आपण मदत करू शकतो त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. या व्यक्तीला तात्काळ मदत करावी, असेही नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 
वज्राघातापासून बचावासाठी काय करावे?
•गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणा-या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे
•विजेवर चालणाल्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावी.
•आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.
•घरात असल्यास : घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपण पासून दूर रहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.
•घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. 
•ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. 
•गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात. 
•खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातू पासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात.
•उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. 
•जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा.
•मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा.
•जंगलामध्ये - दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.
•इतर खुल्या जागेवर : दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणाऱ्या पुरापासून सावध रहावे). 
•जर जमीनीच्या वर पाणी आल्यास ताबडतीब सुरक्षित निवारा शोधून काढावा.
 
'वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास  
•त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकिय मदत बोलवा
•वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकिय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या थंड परीस्थितीत, बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.
इजा झालेल्या इसमास असे हाताळा 
•श्वसन बंद असल्यास:- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी. 
•हृदयाचे ठोके बंद असल्यास : कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करुन सुरु ठेवा. 
•रुग्णाचा श्वास व नाडी सुरू असल्यास : इतर दुखापतींसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे)
 
हे करू नका
•गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळया जागांवर समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे / बस / सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे. 
•घरात असल्यास : वायरद्वारे जोडले गेलले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रोक/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (अशा आपत्कालीनवेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे) 
•गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये.
•या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करू नयेत. 
•काँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. 
•प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग व प्लंबींग/नळ) 
•घराबाहेर असल्यास : मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये 
•वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स पासून लांब रहावे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Horoscope Today 19 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget