एक्स्प्लोर

Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार; सांभाळल्या आहेत 'या' विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Dinesh Waghmare : माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज (28 जानेवारी) राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.

मुंबई : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज (28 जानेवारी) राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.  यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त असल्याने दिनेश वाघमारे यांनी आज या पदाचा कारभार स्वीकारला आहे. 

कोण आहेत दिनेश वाघमारे

राज्य नवनियुक्त निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (1987) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक (1989), तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एमएस्सी (2007) केले आहे. 1994च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

दरम्यान, रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव तसेच नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

अनेक सन्मानाने सन्मानित

दिनेश वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया 2021 अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड 2021, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, 16 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना SEC पदासाठी उमेदवाराची शिफारस करण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Anil Parab :  माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
धक्कादायक! प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
Embed widget