...अन्यथा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा इशारा
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भावी खासदारांकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही तर
Dhule News धुळे : राज्यात होऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या (Police Recruitment) पार्श्वभूमीवर सध्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून मैदानी चाचणीचा सराव सुरू आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भावी खासदारांनी वयोमर्यादेसह परीक्षा फी कमी करण्याच्या प्रश्नावर निर्णय न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेला आहे.
राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे भावी पोलीस कर्मचारी सध्या मैदानी चाचणीचा सराव करीत असून होऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांनी भावी खासदारांकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
राजस्थानच्या धर्तीवर सर्व स्पर्धा परीक्षा घ्याव्यात
पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबातील असतात. मात्र महाराष्ट्र शासन एक हजार रुपये फी प्रत्येक परीक्षेसाठी आकारात असते. यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. राजस्थानच्या धर्तीवर 120 रुपयांत वर्षभरातील पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
अन्यथा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू
तसेच पेपर फुटीसह भरती प्रक्रियेला येणारी स्थगिती या प्रश्नांकडेदेखील खासदारांनी लक्ष दिले पाहिजे. शासन निर्णयानुसार वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात येऊन त्यांना दिलासा द्यावा अन्यथा या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी पोलीस भरतीत जास्तीत जास्त जागा काढून त्याबाबत देखील खासदारांनी लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा महिला विद्यार्थिनींनी केली आहे.
धुळ्यातील स्टेडीयमकडे शासनाचे दुर्लक्ष
तसेच, आम्ही धुळ्यात बऱ्याच वर्षांपासून सराव करतो. आम्ही ज्या स्टेडीयमवर सराव करतो. त्या स्टेडीयमची कुठलीच काळजी घेतली जात नाही. आम्ही पेपरफुटीचा पाठपुरावा केला असता त्याची कुणीच दखल घेतली नाही. शासनाने आता तरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणीदेखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
धुळे लोकसभेत होणार तिरंगी लढत
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे धुळ्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा