एक्स्प्लोर

ठाकरे गटातील इच्छुकांना झटका अन् काँग्रेसमधील नाराजीनाट्य संपेना; धुळ्यात राजकीय चित्र नेमकं आहे तरी काय?

Dhule Lok Sabha : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेल्याने हा बालेकिल्ला परत आपल्याकडे मिळवण्यासाठी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागत आहे. 

Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) होणारी निवडणूक ही तिरंगी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर काल महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवार जाहीर झाल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला (Shivsena UBT) मिळण्याची मागणी झाली असताना ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसेनेच्या इच्छुकांचे संसदेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. तर काँग्रेसमध्ये (Congress) उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य सुरू झाले आहे. महाविकास आघाडीतील या सगळ्या गोष्टींचा फायदा भाजपाला होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

उत्तर महाराष्ट्रातून धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा ही पारंपारिक पद्धतीने काँग्रेसकडे देण्यात येते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ (Dhule Lok Sabha Constituency) हा भाजपाच्या (BJP) ताब्यात गेल्याने हा बालेकिल्ला परत आपल्याकडे मिळवण्यासाठी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागत आहे. 

जागा वाटपात धुळ्याची जागा काँग्रेसला

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येणारे अपयश पाहता ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीत करण्यात आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा दिल्यास आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू, असा विश्वास देखील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र जागा वाटपात पुन्हा एकदा धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसकडे देण्यात आली. 

शिवसेना ठाकरे गटाचे स्वप्न भंगले, काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न पूर्णतः भंग पावले आहे. काँग्रेसकडून श्यामकांत सनेर, डॉ. तुषार शेवाळे ही दोन नावे चर्चेत असताना अवघ्या दोन ते तीन दिवसांपासून डॉ. शोभा बच्छाव यांचे देखील नाव चर्चेत आले होते. अखेर काल जाहीर झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव निश्चित करण्यात आले. डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. 

डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध

लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी मागणी होत असून डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होऊ लागला आहे.  याचाच परिणाम म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली असून पुढील काही दिवसात उमेदवार न बदलल्यास कठोर निर्णय घेण्याचा पवित्र देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर

एकीकडे भाजपला हरवण्यासाठी देशपातळीवर आणि राज्य पातळीवर विरोधी पक्ष एकत्र येत असताना स्थानिक पातळीवर मात्र उमेदवाराच्या नावाला विरोध करून पक्षातील अंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नामोहरम करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असताना दुसरीकडे मात्र सुरू असलेले नाराजी नाट्य आणि त्यातून निर्माण झालेले वाद हे महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे. 

धुळ्यात तिरंगी लढत

धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र महा विकास आघाडीतील अंतर्गत धुसपुस आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल, असे बोलले जात आहे. 

नाराजीनाट्य थांबवण्याचे आव्हान

तर दुसरीकडे पक्षातील नाराजीनाट्य थांबवण्याचे आव्हानदेखील पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाले आहे. उमेदवारीबाबत नाराज झालेल्या इच्छुकांची मनधरणी करून कार्यकर्त्यांची समजूत काढून महाविकास आघाडी कशा पद्धतीने प्रचारात सहभागी होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

आणखी वाचा 

पक्षाच्या एकनिष्ठतेचे बक्षीस! धुळ्यातून सुभाष भामरेंविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या शोभा बच्छाव आहेत तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget