एक्स्प्लोर

Dhule Rain : धुळे जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीमुळं 10 हजार शेतकऱ्यांना फटका, नुकसानीचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर 

धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

Dhule Rain : धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळं तब्बल 149 गावातील 10 हजार 108 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे साक्री आणि शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. दरम्यान, नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आला आहे.

33 टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान 

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुक्यातील 30 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र तीन हजार 78 आहे. एकूण 18 गावातील 4 हजार 729 शेतकऱ्यांना या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे. तर शिरपूर तालुक्यातील 3 हजार 175 हेक्‍टरवर 33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 58 गावातील 2 हजार 550 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यात तब्बल 1 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, 72 गावातील 2 हजार 827 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे पंचनामे करण्याचे आदेश

दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. अशातच आता जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

राज्यात 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सभागृहात केली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागितले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget