एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'वारकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा...'; धुळ्यात संजय राऊतांच्या पोस्टरला 'जोडे मारो'

Dhule News : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते. राऊतांच्या वक्तव्याविरोधात भाजप अध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.

Dhule News धुळे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर वारकरी चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. धुळ्यात खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या तसेच भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या (BJP Adhyatmik Aghadi) वतीने श्रीराम मंदिरासमोर वारकऱ्यांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडो मारो तसेच टाळ मारो आंदोलन केले. 

शिंदे सरकारने आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे. आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होते. 

आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलनाचा इशारा

आता या विधानावरून खानदेश वारकरी सेवा मंडळ चांगलेच आक्रमक झाले आहे. संजय राऊत यांच्या पोटात वारकऱ्यांना वीस हजार रुपये दिले म्हणून पोटसूळ उठला आहे. म्हणून ते असे वक्तव्य करीत असतात. संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मोठ्या स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा खानदेश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य चुकीचं

दरम्यान, काल त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते. यावेळी वारकर्‍यांशी संवाद साधला असता त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अनुदानावर वारकरी अवलंबून नाही. वारकरी लाचार नाही. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांच्या खिशातून देत नाही, तो जनतेचाच पैसा आहे.  शेकडो वर्षांची परंपरा आम्ही जपतो आहोत. वारकऱ्यांवर बोलणे चुकीचे आहे. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांचे कामच आहे. आमचा पैसा टॅक्स घेऊन सरकारला जमा होतो, अशी प्रतिक्रिया यावेळी वारकऱ्यांनी दिली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Raosaheb Danve : 'लोकांना आता ठोस कामं हवी, करमणूक नकोय'; रावसाहेब दानवेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Girish Mahajan : 'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget