Girish Mahajan : 'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा
Girish Mahajan : लोकसभेत 9 जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती आलीय. ही मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, असा इशारा गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिला.
Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यातून (Shiv Sena Vardhapan Din) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे का, मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला, अशी टीका त्यांनी केली. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. यावरून आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे. काल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलले. मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री आहेत, असं असूनही इतक्या खालच्या पद्धतीवर बोलणं यातून ते नेमकं काय खाऊन काय पिऊन बोलतात हेच कळत नाही. ते दिवसभर नशेत असतात.
एवढा उन्माद करू नका, तुमची मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही
संजय राऊत यांच्या टीकेवर उद्धव ठाकरेही दाद देत होते, याचं दुःख आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकसभेत 9 जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती आलीय. ही मस्ती उतरवायला वेळ लागत नाही. तुमच्या जागा कशा निवडून आल्या हे काल एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे एवढा उन्माद करू नका, तुमची मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिले.
मोदींवर बोलण्याची पात्रता आहे का?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही विधानसभेचा प्रचार आत्तापासूनच करा, असे खुले आव्हान दिले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, विजयामुळे फार उन्माद येऊ देऊ नका. बोलताना तारतम्य ठेवा. तुमची मोदींवर बोलण्याची पात्रता आहे का? जरा भान ठेवा. भाजपच्या महिला उमेदवारांबाबत संजय राऊत यांनी केलेली विधाने म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे त्यांनी म्हटले.
रामदास कदमांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
मोदी-शाहांकडून विधानसभा निवडणुकीसाठी 100 जागा मागा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, भुजबळ वेगळं बोलतायत. रामदास कदम वेगळं बोलतायत. शेवटी हा निर्णय दिल्लीत होईल. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
आणखी वाचा