एक्स्प्लोर

Dhule Scam Case : गुलमोहर  रेस्ट हाऊस प्रकरणात नवी अपडेट; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 

गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांनी न्यायालयात धाव घेतली असता दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी काल न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Dhule Scam Case : धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली होती. विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना ही रक्कम मिळून आल्याने समितीमधील आमदारांना देण्यासाठीच हे पैसे आणण्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. सर्वप्रथम या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, हा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आणि दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी काल (11जुलै) धुळे जिल्हा न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काही वेळापूर्वीच धुळे शहर पोलीस ठाण्यात कलम 308 कलम 233 आणि कलम 241 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि संशयित सह आरोपी राजकुमार मोगले यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

काय आहेत कलम?

308 खंडणी एखाद्या व्यक्तीला इजा करण्याची, भीती दाखवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे दबाव आणून त्याच्याकडून जबरदस्तीने काही मालमत्ता, पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू घेण्याचा प्रयत्न करणे 

कलम 233 एखाद्या व्यक्तीला पुरावा खोटा आहे हे माहीत असूनही, तो खरा आहे असे भासवून त्याचा वापर करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे

कलम 241 मध्ये पुरावा म्हणून सादर होण्यापासून रोखण्यासाठी कागदपत्रे नष्ट करणे, लपवणे किंवा बदलणे याबद्दल सांगितले आहे. जर कोणी जाणीवपूर्वक कोणताही कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड नष्ट केला, लपवला किंवा त्यात बदल केला.

एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली

खोली क्रमांक 102 मध्ये रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर, माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशीची मागणी केली होती. या मागणीस पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खोली क्रमांक 102 च्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा प्रक्रिया पार पडली. यावेळी खोलीचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या तपासणीत एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड सापडली आहे. तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget