ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून मंत्री बावनकुळेंचा जाहीर सत्कार, कार्यक्रमात मानाचे पान
तुळजापूर (Tuljapur) ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule ) यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
Dharashiv : तुळजापूर (Tuljapur) ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule ) यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. विनोद उर्फ पिंटू गंगणे असं जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचं नाव आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला जाहीर कार्यक्रमात मानाचे पान देण्यात आले आहे. जामिनावर बाहेर असलेल्या या आरोपीनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. या आरोपीला महसूलमंत्र्यांकडून शाबासकीची थाप मिळाली आहे.
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटींचा निधी मंजूर करुन दिला आहे. त्यामुळं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला आहे. सत्काराला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचीही उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
Pranjal Khewalkar : ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा























