Dharashiv News: नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवारचे प्रशासनाने केले निलंबन
इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. कोनगुलवारच्या मागावर पोलीस असून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.

Dharashiv News: देशपातळीवर गाजत असणाऱ्या नीट घोटाळ्यातील(NEET-UG paperleak) आरोपी इरण्णा कोनगुलवारवर प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. काेनगुलवार याला आरटीआय प्रशासनाने निलंबीत केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. कोनगुलवारच्या मागावर पोलीस असून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.
इरण्णावर कोनगुलवारवर निलंबनाची कारवाई
नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्येही सापडले आहेत. नीटमध्ये गुण वाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्कात असाणारा उमरगा आयटीआरमधील नोकरी करणाऱ्या इरण्णा कोनगुलवार या आरोपीवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवत होता अशी माहिती देण्यात आली होती.
लातूरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल
नीट गैरव्यवहार प्रकरणात लातूर येथे चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तर आरोपी इराण्णा कोनगलवार हा अद्याप फरार आहे. यातील मुख्य आरोपी गंगाधर यास सीबीआयच्या बंगलोर टीमने यापूर्वीच अटक केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात नीट पेपर फुटल्याची केंद्राची कबुली
नीटचा पेपर लीक झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्र सरकारने दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींनाही अटक केल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. पेपरफुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांची ओळख पटली असल्याचंही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.
हेही वाचा:
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
