Beed Crime News: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक; आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत थेट निशाणा
Beed Crime : बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे हे आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला.

Beed Crime : बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणी थेट आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यावर निशाणा साधला. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर रविवारी पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला. त्या दिवशी आरोपी 11 वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होते. या प्रकरणात हे येण आवश्यक आहे. अनेक भगिनी यात होत्या. ज्यांचा छळ सुरू होता. मात्र इज्जत बरी त्यामुळे त्या पुढे आल्या नाहीत. या प्रकरणात इथल्या आमदाराचे किती कनेक्शन आहे हे समजले पाहिजे आणि याच प्रकरणात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
दीडशे दिवसानंतर मी आज बोलतोय- धनंजय मुंडे
दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार असून या प्रकरणात SITची मागणी करणार असल्याचंही माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. 150 दिवस मी अनुभवले आहे. दीडशे दिवसानंतर मी आज बोलतो आहे. त्यामुळे या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपी शिक्षक आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड असून ही अटक झाली नाही तर ते सरेंडर झाले आहेत, असेही ते म्हणाले.
बीड बंदला तूर्तास स्थगिती
दरम्यान, आज पक्ष संघटनांकडून बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र हा बंद तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षकांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना बीड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पक्ष संघटना आणि पालकांनी बीड बंदची हाक दिली होती. मात्र यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केलीय. त्यामुळे आता या दोन्ही शिक्षकांचा पुढील दोन दिवसांचा मुक्काम हा पोलीस कोठडीत असणार आहे.
30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून कुटुंबाला मारहाण, घरातील साहित्याची तोडफोड
बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण झाली असून महाराणीसह टोळक्याने घरातील साहित्याची देखील तोडफोड केली. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा


















