विजय पवार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड, घटनेनंतर रात्री आमदाराच्या घरी, फोनकॉलही गेले, बीड लैंगिक छळाप्रकरणी योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे पडसाद आता संपूर्ण जिल्हाभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांनी शैक्षणिक बंद पुकारला आहे.

Beed crime : बीड जिल्ह्यात खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ आणि छेडछाड प्रकरणाने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात फॉक्स अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे पडसाद आता संपूर्ण जिल्हाभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांनी शैक्षणिक बंद पुकारला आहे. अल्पवयीन मुलीच्या छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार याला राजकीय पाठबळ असून आमदार संदीप क्षीरसागर यांचा तो राईट हॅन्ड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांचे भाऊ व अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केलाय. (Beed Sexual Harassment Case)
घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.
विजय पवारला राजकीय पाठबळ
मागील दोन वर्षात बीड वेगळा वळणावर असताना ही घटना शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी आहे. ही घटना झाल्यानंतर यातील शिक्षक रात्री लोकप्रतिनिधींच्या घरी होता आणि त्या ठिकाणाहून यंत्रणेला फोन देखील केला. यातील फराळ आरोपी अजून का पकडले गेले नाही त्याचा तपास कोणा गरजेच कोणा कोणाचा दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला? ज्या लोकांसोबत हे शिक्षक राहतात त्यांच्याकडून कितपत पाठिंबा त्यांना दिला गेला आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे.
विजय पवार हा शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. लहान मोठ्या क्लासेस इथे येऊ नयेत यासाठी मोठा दबाव तंत्र त्यांना वापरलं. अनेक जमीन घोटाळ्यात शिक्षण पवार सामील असून कोट्यवधी रुपयांची माया त्याने जमा केली आहे. त्यातून येथील राजकारण सुरू असल्याचं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं. आरोपी विजय पवार विद्यमान आमदारांचे राईट हॅन्ड असल्यासारखे आहेत. घटनेनंतर ते आमदारांच्या घरी गेलेत रात्री. याचा तपास व्हायला पाहिजे. यांचे कुठे कुठे फोन कॉल गेलेत? कुठून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला? इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी फरार राहतोच कसा? याचा तपास घेतला पाहिजे. असेही ते म्हणाले.
महिला आयोगानेही घेतली दखल
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची प्रसार माध्यमांवर झळकलेली बातमी पाहून राज्य महिला आयोगाने तात्काळ दखल घेतली. उमा किरण क्लासेस मधील दोन प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचा आयोगाने नमूद केला आहे. आरोप निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार आरोपींचा शोध घ्यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची ही नोंद घ्यावी अशा सूचना महिला आयोगाने केल्या आहेत. याप्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलद्वारे सादर करण्याचा आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हेही वाचा
























