Delhi Metro : दिल्ली मेट्रोमधली मारामारी आणि भांडणं नव्हे तर, नवा मुद्दा चर्चेत; मेट्रोत चक्क कंडोमने भरलेला बॉक्स सापडला; नेमकं प्रकरण काय?
Condoms In Delhi Metro : दिल्ली मेट्रो कायम सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरत असते. मात्र, आता एक असाच आगळा वेगळा प्रकार दिल्ली मेट्रोमध्ये घडला असून या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Delhi Metro : दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro)कधी मारहाणीचे व्हिडीओ असतील किंवा इतर घटनांमुळे दिल्ली मेट्रो कायम सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरत असते. मात्र, आता एक असाच आगळा वेगळा प्रकार दिल्ली मेट्रोमध्ये घडला असून या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यात चक्क एका प्रवाशाला कंडोमने भरलेला बॉक्स (Condoms In Delhi Metro) सापडलाय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर मजेदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र हा कंडोमने भरलेला बॉक्स नेमकं कुणी आणि कुठून मेट्रोमध्ये आला? हे अद्याप कळू शकलेलं नाही. असं असलं तरी नेटकाऱ्यांनी मात्र या मुद्दयावर गमतीशीर प्रतिक्रिया देत यावर भाष्य केलंय.
Condoms In Delhi Metro : बॉक्सभोवती कंडोमचे अनेक पॅकेट विखुरलेले, फोटो व्हायरल
ऐरवी, दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा हरवलेल्या वस्तू सापडतात, जसे की मोबाईल फोन, छत्री, किंवा झोपलेल्या प्रवाशांचे सामान. पण चक्क कंडोमचा एक मोठा बॉक्स? ही खरोखरच एक दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना म्हणायला हवी. दिल्ली मेट्रोच्या एका नियमित प्रवाशाला मोट्रोमध्ये काहीतरी अनपेक्षित असा बॉक्स आढळून आला. स्टेशनच्या गेटच्या मागे त्याला कंडोमने भरलेला एक मोठा बॉक्स पडलेला दिसला. बॉक्सभोवती कंडोमचे अनेक पॅकेट विखुरलेले होते. या घटनेचा फोटो नंतर सोशल मीडियावर शेअर केला आणि अल्पावधीतच हि पोस्ट व्हायरल झाली.
Photo Viral in Social Media : नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस
दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आणि त्यावरून अनेक कमेंट्स आल्या. काहींनी दिल्ली मेट्रोच्या पूर्वीच्या उपक्रमाची आठवण करून दिली, जेव्हा मेट्रोने सार्वजनिक आरोग्य मोहिमेचा भाग म्हणून कंडोम वाटण्यास सुरुवात केली. तर काहींनी विनोदही केला. हा कंटेनर पाहून इतर प्रवाशांना काय विचित्र विचार आले असतील, असा प्रश्न विचारला. एका व्यक्तीने लिहिले, "आज सकाळीच, मी ऐकले की असे कंडोम बस स्टँड, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवले जातात जिथे खूप गर्दी असते. ही एक चांगली व्यवस्था आहे." दुसऱ्या वापरकर्त्याने गंभीरपणे विचारले, "मला प्रामाणिकपणे सांगा, लोक खरोखरच हे कंडोम वापरतात का? मला वाटते की हा देशाच्या आरोग्य विभागाचा एक उत्तम उपक्रम आहे.
एकाने विनोदाने म्हटले, पॉप-पॉप क्रॅकर्स
अशातच एकाने विनोदाने म्हटले कि, "सुरुवातीला मला वाटले की हे पॉप-पॉप क्रॅकर्स आहेत, पण कमेंट वाचल्यानंतर मला कळले की ते कंडोम आहेत." दुसऱ्याने कमेंट केली कि, "हे ग्रामीण भागांसाठीचे सरकारी कंडोम नाहीत का? जर तुम्हाला शक्य असेल तर कृपया ते सरकारी रुग्णालयात परत करा." शेवटी, एका व्यक्तीने संशय व्यक्त केला, "असे दिसते की सरकारी योजनांअंतर्गत मोफत वाटण्यासाठी असलेल्या कंडोमचा गैरवापर केला जात आहे. सरकारी आरोग्यसेवेत अशा गोष्टी सामान्य आहेत."
हे हि वाचा
























