एक्स्प्लोर

नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको, राज्यातील सर्वधर्मियांच्या हक्कांचं संरक्षण करणार : मुख्यमंत्री

आपण संबंधितांशी चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलानात हिंसाचाराचा मार्ग न अवलंबता राज्याच्या लौकीकास धक्का लागू नये याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील जनतेला शांतता बाळगण्याबाबत आवाहन करावे, असेही ठाकरे म्हणाले.

नागपूर :नागरिकत्व कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत. या कायद्यावरुन देशासह राज्यात निदर्शनं होत आहेत. सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सुधारीत नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर देशात अशांतता, भिती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. देशभरात या कायद्याविरोधात आंदोलन होत असून आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. अशावेळी सर्वांनी मिळून जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याची गरज आहे. स्वत: मुख्यमंत्री म्हणून आपण कायदा व सुव्यवस्थेबाबत विविध घटकांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत चर्चा व्हायची आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत निवेदन द्यावे. त्याबाबत आपण संबंधितांशी चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलानात हिंसाचाराचा मार्ग न अवलंबता राज्याच्या लौकीकास धक्का लागू नये याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील जनतेला शांतता बाळगण्याबाबत आवाहन करावे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र देशाला नेहमी वेगळी दिशा देतो. कोणतीही भीती मनात ठेवू नका. काही लोकं विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांच्या अमिषांना बळी पडू नका, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं काही करु नका, असंही ते म्हणाले. या देशातून तुम्हाला हाकललं जाईल, असा गैरसमज होऊ देऊ नका, असंही ते म्हणाले. हेही वाचा - CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे आज सलग दुसऱ्या दिवशी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यात आंदोलन सुरु आहेत. विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले आहेत. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लिम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला. याशिवाय पुण्यातही मुस्लिम समाजाकडून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
New Rule From 1 April 2026: रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास...नवीन आर्थिक वर्षे, नवे नियम; आजपासून काय काय बदलणार?, A टू Z माहिती
रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास...नवीन आर्थिक वर्षे, नवे नियम; आजपासून काय काय बदलणार?, A टू Z माहिती
Jalgaon News : रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या 2 महिन्यांच्या बाळासोबत आक्रीत घडलं; पहाटे दृष्य पाहताच अख्ख गाव हादरलं, जळगावच्या चोपड्यातील घटना
रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या 2 महिन्यांच्या बाळासोबत आक्रीत घडलं; पहाटे दृष्य पाहताच अख्ख गाव हादरलं, जळगावच्या चोपड्यातील घटना
Shubh Yog: 5 राशींची चिंता मिटली! एप्रिलच्या पहिल्याच दिवशी अमला योगासह जुळले शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने प्रगती दुप्पट
5 राशींची चिंता मिटली! एप्रिलच्या पहिल्याच दिवशी अमला योगासह जुळले शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने प्रगती दुप्पट

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget