एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईकरांना स्वस्त आणि हक्काचं घर मिळेल: मुख्यमंत्री
मुंबई: मुंबईकरांना हक्काचं आणि स्वस्तात घर मिळण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण आहे. मुंबईकरांच्या हिताचेच धोरण केले जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
'आजच्या धोरणाचा टप्पा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे.' असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. येत्या काही काळात मुंबईसह राज्यातील महत्वपूर्ण महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवं धोरण जाहीर कऱण्यात आलं.
दरम्यान गृहनिर्माण धोरणाचं श्रेय़ एकट्या भाजपनं लाटू नये म्हणून शिवसेनेनं, घाटकोपरमध्ये चक्क गुजराती भाषेतून बॅनर झळकावले आहेत. गुजराती भाषेतून बॅनर लावून शिवसेनेनं गुजराती मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.
घाटकोपर हा भाजपचा गड मानला जातो. तिथले गुजराती मतदार ही भाजपची हक्काची व्होट बँक मानली जाते. मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी रणनिती आखल्याचं समजतं आहे.
कदाचित म्हणूनच, 'करून दाखवलं' अशी मराठीतून बॅनरबाजी करणाऱ्या सेनेनं यंदा गुजरातीतून बॅनर झळकावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement