मतदान करा, मोफत पैठणी मिळवा, मतदानादिवशी 'या' दुकानात महिलांसह पुरुषांना विशेष ऑफर
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुकानात विशेष ऑफर देण्यात आली आहे. मतदान करा आणि मोफत पैठणी साडी मिळवा अशी विशेष ऑफर देण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (13 मे 2024) पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जागांवर देखील मतदान पार पडणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुकानात विशेष ऑफर देण्यात आली आहे. मतदान करा आणि मोफत पैठणी साडी मिळवा अशी विशेष ऑफर देण्यात आली आहे.
मतदान करून दुकानात येणाऱ्या पहिल्या 31 महिलांना देण्यात येणार पैठणी
सकाळी मतदान करून लवकर दुकानात या आणि पैठणी साडी मोफत घेऊन जा अशी ऑफर संभाजीनगरमधील कापड दुकानामध्ये मतदानाच्या दिवशी देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्या मतदान होतं आहे. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विविध प्रयोग केले जातायेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न केले जातायेत. मतदानाचा अधिकार नागरिकांनी आवर्जून बजवावा, यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास श्याम कुमार या कपड्याच्या दुकानातील दोन्ही शाखांमध्ये विशेष ऑफर देण्यात आली आहे. सकाळच्या वेळी मतदान सुरु झाल्यानंतर मतदान करून दुकानात येणाऱ्या पहिल्या 31 महिलांना मतदान केल्याची शाई दाखवून पैठणी साडी मोफत दिली जाणार आहे.
31 पुरुषांना कॉटन कॅन्डी चे शर्ट पॅन्ट पीस मोफत
दरम्यान, महिलांसोबत पुरुषांनाही खास ऑफर देण्यात येणार आहे. मतदान करून येणाऱ्या पहिल्या 31 पुरुषांना कॉटन कॅन्डी चे शर्ट पॅन्ट पीस मोफत दिले जाणार आहे. तर दिवसभर सुद्धा या दोन्ही दुकानांमध्ये विशेष सवलतीमध्ये कपड्यांची विक्री केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार
उद्या देशात मतदानाचा चौथा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये उद्या मतदान होणार आहे. या सर्वच मतदारसंघामधील लढती या महत्वाच्या मानल्या जात आहेत. सर्व ठिकाणच्या फाईट या तगड्या समजल्या जातायेत. सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. मात्र, आता जनता कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: