ती रडत होती, ओरडत होती...पण तो मारतच होता; दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने तरुणीला बेदम मारहाण
Aurangabad Crime News : औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील ही घटना असून, मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
![ती रडत होती, ओरडत होती...पण तो मारतच होता; दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने तरुणीला बेदम मारहाण video viral Aurangabad girl brutally beaten Beaten for seen with another boy ती रडत होती, ओरडत होती...पण तो मारतच होता; दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने तरुणीला बेदम मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/01/65badd211d0f49a3f82ec2696b0f45d21690892576859737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दुसऱ्या मुलासोबत पहिल्याने ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील ही घटना असून, मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबादमधील भांडण वाली लव स्टोरी समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील या भांडण वाली लव स्टोरीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने तरुणीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. तरुणीला दुसऱ्या मुलासोबत बघितले म्हणून या तरुणीला मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तरुणीकडून सोडण्याची विनंती केली जात असताना सुद्धा तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरूच होती. लोकं पाहत आहेत असं म्हणत, मुलगी ओरडत होती. तसेच मारहाण करू नको मला सोडून दे म्हणून विनंती करत होती. मात्र, डोक्यात राग गेलेल्या तरुणाकडून मारहाण सुरूच होती.
ती रडत होती, ओरडत होती...
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एका मुलीला तरुण बेदम मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. मुलीची कॉलर पकडून तिला ओढत आहे. तसेच पोटावर मारहाण करतोय. तसेच लाथा देखील मारत आहे. यावेळी मुलगी जोरजोरात रडत होती. तसेच मला मरू नको म्हणून विनवणी करत होती. तर लोकं पाहत आहेत मला सोडून दे असे देखील सांगत होती. मात्र, मारहाण करणारा तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलगी विनंती करत असताना त्याच्यावर कोणताही फरक पडत नव्हता आणि त्याची मारहाण सुरूच होती.
दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने मारहाण...
ही मारहाणीची घटना सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथील असल्याचे बोलले जात आहे. तर प्रेम प्रकरणातून ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित मुलगी इतर मुलासोबत दिसल्याने मारहाण करणाऱ्या मुलाला याचा राग आला होता. दुसऱ्या मुलासोबत काय करत आहे?, त्याचासोबत का फिरत आहे? असे म्हणत त्याने सुरवातीला वाद घातला. त्यानंतर बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. तर तिथे उपस्थित असललेल्या काही लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)