मोठी बातमी : वाद विकोपाला जाताच उद्धव ठाकरेंनी दानवे-खैरेंना मातोश्रीवर बोलावले; उमेदवारी कुणाला मिळणार?
Ambadas Danve Vs Chandrakant Khaire : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद समोर आला आहे.
Ambadas Danve Vs Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जागेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यातील वाद समोर आल्याने याची दखल थेट उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. तर, उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी या दोनही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी त्यांना मातोश्रीवर (Matoshree ) बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळी 11.30 वाजता या दोनही नेत्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे असणार आहे. तर, चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशात अंबादास दानवे देखील याच मतदारसंघासाठी इच्छुक आहे. विशेष म्हणजे दोनही नेत्यांकडून एकमेकांविरोधात उघडपणे नाराजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दोनही नेत्यांमधील अंतर्गत वाद लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी योग्य नसल्याने याची दखल थेट उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना यांना आज मातोश्रीवर बोलावले आहे. सकाळी 11.30 वाजता या दोनही नेत्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण, उमेदवारी कुणाला फायनल होणार हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचे असणार आहे.
ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून नाराजी
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत जागावाटपात कोल्हापुरनंतर, हातकंणगले, अमरावती आणि रामटेकही मतदारसंघ देखील काँग्रेस सोडले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा दावा असलेले मतदारसंघ काँग्रेसला सोडले जाता असल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत. विशेष म्हणजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याचा राजू शेट्टींना ठाकरेंचा प्रस्ताव असल्याची चर्चा असून, त्यातच राजू शेट्टी मातोश्रीवर आल्यानं शिवसैनिकांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
खैरे-दानवे नेमका वाद काय?
लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्वतः अंबादास दानवे हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची देखील इच्छा आहे. तर, खैरे यांच्याकडून मला सतत डावलण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. दुसरीकडे मी जर दानवे यांना डावलले असते, तर ते इथपर्यंत पोहचले नसते असा टोला खैरे यांनी लगावला आहे. त्यामुळे दोनही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी त्यांना आज मातोश्रीवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :