एक्स्प्लोर

CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी

CM Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. मनसेच्या नेत्याची वेगळीच मागणी.

छत्रपती संभाजीनगर: आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या (CM Ladki Bahin Yojna) अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक मागणी केली आहे. राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे.  प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. 

राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. 

वाशिमध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी गर्दी

राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी रांगा लागल्या. या योजनेसाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरिकांनी सकाळी सहा वाजेपासून धावपळ सुरु केली आहे. योजनेची मुदत वाढ करूनही महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे चित्र आहे. रांगा आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी  पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आल्याचं चित्र वाशिममध्ये पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरण्याचे निकष

* सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

* या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

* सदर योजनेतून 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी ही अट वगळण्यात आली आहे.

* सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

* परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र  ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

* रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड

* उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

* सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आणखी वाचा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
Embed widget