एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपला धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन

Chhatrapati Sambhajinagar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश केला.

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेनेतील बंडखोरीमुळे पक्षात निर्माण झालेल्या दोन गटात आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नाही. तर दोन्ही पक्षाकडून पक्षप्रवेशावर भर दिला जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला (BJP) मोठा धक्का देत शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश करण्यात आला. तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश केला असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे शेकडो भाजप पदाधिकारी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तर रोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड आदी उपस्थित होते.

यांचा झाला पक्षप्रवेश! 

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका बबीता चावरिया, भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माझी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर, भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. 

शिवगर्जना अभियान अंतर्गत भव्य मेळावा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे शिवगर्जना अभियान अंतर्गत भव्य मेळावा तापडिया नाट्य मंदिरात पार पडला. परिस्थिती कोणतीही असो, ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी सदैव राहू, असा निर्धार निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांनी शिवगर्जना मोहिमेत केला. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत आघाडी यांनी शिवगर्जना अभियानास गर्दी केली होती. तर मुंबईच्या माजी महापौर पेडणेकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

इतर महत्वाच्या बातम्या:

अखेर नामांतराच्या विरोधातील आंदोलनाची जलील यांच्याकडून घोषणा, शनिवारपासून बेमुदत उपोषण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget