एक्स्प्लोर

संतापजनक! गटसचिवाची शेतकरी दाम्पत्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar : या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिवीगाळ करणाऱ्या गटसचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : आधीच शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासह गारपीटच्या संकटाने अडचणीत आला आहे. दरम्यान असे असताना शेतकऱ्यांची शासकीय ठिकाणी होणारी अडवणूक काही थांबता थांबत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील शेतकरी दाम्पत्याने कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात पैसे देण्यास नकार दिल्याने सोसायटीच्या गटसचिवाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिवीगाळ करणाऱ्या गटसचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू किसन वानखेडे असे शिवीगाळ करणाऱ्या गटसचिवाचे नाव आहे. 

या प्रकरणी पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील साहेबराव बाजीराव पवार आणि त्यांच्या पत्नी अलकाबाई साहेबराव पवार हे बँकेच्या कामासाठी सोमवारी (10 एप्रिल) सिल्लोडच्या अंधारी येथील बँकेत गेले. यावेळी तिथे उपस्थित असलेला सोसायटीचा गटसचिव बाळू किसन वानखेडे हा पवार यांच्याकडे आला. तसेच तुमचे सोसायटीचे कर्ज मी मंजूर केले असून, त्याबदल्यात मला तीन हजार रुपये द्या असे म्हणाला. पण पवार यांनी पैसे नसल्याचे सांगत, पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या वानखेडे याने साहेबराव पवार यांच्या हातातून बँकेचे पासबुक हिसकावून घेतले आणि फाडून फेकले. 

अलकाबाईंना शिवीगाळ केली 

पैसे न दिल्याने गटसचिव बाळू किसन वानखेडे याने शेतकरी पवार यांचे खातेपुस्तक फाडले. त्यामुळे पवार यांच्या पत्नी अलकाबाईंनी वानखेडेला जाब विचारला. तर जाब विचारताच वानखेडे आणखीनच भडकला आणि अलकाबाईंना शिवीगाळ करत घरात घुसून मारेन, अशी धमकी दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी वानखेडे यास समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे पवार शेतकरी दाम्पत्य हताश होऊन तेथून निघून गेले. 

पोलिसात गुन्हा दाखल...

वानखेडे याने शिवीगाळ केल्याने गरीब शेतकरी पवार दाम्पत्य तेथून निघून गेले. पण या घटनेचा व्हिडीओ काही वेळाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यावर सगळीकडे संताप व्यक्त होऊ लागला होता. त्यामुळे अनेकांनी पवार दाम्पत्याला हिंमत दिली आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी (11 एप्रिल) अलकाबाई साहेबराव पवार यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गटसचिव बाळू वानखेडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :  

Transfers : मराठवाड्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे बदली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRSS Vijayadashmi Sohala :  RSSच्या विजयादशमी सोहळ्यात ध्वजारोहणRSS Nagpur :  नागपुरात आरएसएसचा विजयादशमी सोहळा; पथसंचलनABP Majha Headlines : 8 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Embed widget