'वन ऑफिसर, वन नंबर'; अधिकारी बदलला तरीही पोलीस ठाण्याचं नंबर तोच राहणार; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची योजना
Chhatrapati Sambhaji Nagar : शहर पोलीस दलातील सर्वच विभाग आणि पोलीस ठाण्याचे मोबाईल नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारताच वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या आहेत. पोलीस नागरिकांचा संवाद राहण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच त्यांनी 'वन युनिट,वन ऑफिसर आणि वन मोबाईल नंबर' अशी अभिनव योजना सुरु केली आहे. यासाठी प्रत्येक विभाग आणि पोलीस ठाण्यासाठी एक विशेष मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ज्यात पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्याचे प्रमुख बदलले तरीही त्या पोलीस ठाण्याचा मोबाईल क्रमांक मात्र कायमस्वरूपी एकच असणार आहे. तर शहर पोलीस दलातील सर्वच विभाग आणि पोलीस ठाण्याचे मोबाईल नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत.
अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीसांना तात्काळ माहिती कळविणेकरीता अवधी लागतो. सर्व सामान्य जनतेने पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही किंवा ते मोबाईलवर प्रतिसाद देत नाही. तसेच पोलीस स्टेशन किंवा शाखेतील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन बदलून आलेल्या पोलीस अधिकारी यांना त्या विभाग किंवा परीसरातील लोकप्रतीनिधी, सामान्य जनता, गुप्त बातमीदार, पोलीस मित्र यांच्याशी संपर्क होण्याकरिता अडथळा निर्माण होतो. नवीन अधिकारी यांचा जनतेशी संपर्क होईपर्यत महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे पोलीस अधिकारी व जनतेतील "सुसंवादात होणारा हा महत्वाचा अडथळा दूर करण्यासाठी 'वन युनिट,वन ऑफिसर आणि वन मोबाईल नंबर' ही संकल्पना येत्या एक जूनपासून छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त लोहिया यांनी दिली आहे.
तसेच पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यास त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी पदभार सोडतांना, पदभार स्वीकारणारे अधिकारी यांना देणे बंधनकारक राहणार असून शासकीय अभिलेखी त्याची नोंद असणार आहे. तसेच पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी याबाबत आदेश काढले असून, सदरचे मोबाईल नंबर सर्व पोलीस स्टेशन आणि शाखा येथील शहरवासीयांना माहिती व्हावेत याकरीता नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे.
पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेले मोबाईल नंबर...
मा. पोलीस आयुक्त सो : 9226514001
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) : 9226514002
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 01) : 9226514003
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 02) : 9226514004
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा : 9226514005
सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन : 9226514006
सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा : 9226514007
सहायक पोलीस आयुक्त, शहर विभाग : 9226514008
सहायक पोलीस आयुक्त, छावणी विभाग : 9226514009
सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग : 9226514010
सहायक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग : 9226514011
सहायक पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा : 9226514012
पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष : 9226514013
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा : 9226514014
पोलीस निरीक्षक, विशेष शाखा : 9226514015
पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा : 9226514016
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सायबर : 9226514017
पोलीस निरीक्षक, सुरक्षा विभाग : 9226514018
पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक व नाशक पथक : 9226514019
पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग : 9226514020
पोलीस निरीक्षक, हायकोर्ट सुरक्षा : 9226514021
पोलीस निरीक्षक, वाचक शाखा : 9226514022
पोलीस निरीक्षक, भरोसा सेल (महिला सहाय्यता कक्ष): 9226514023
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सिटी चौक : 9226514024
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. क्रांतीचौक: 9226514025
पोलीस निरीक्षक पो.स्टे. छावणी : 9226514026
पोलीस निरीक्षक पो.स्टे. वाळुज : 9226514027
पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम वाळुज : 9226514028
पोलीस निरीक्षक पो.स्टे. बेगमपुरा : 9226514029
पोलीस निरीक्षक पो.स्टे. दौलताबाद: 9226514030
पोलीस निरीक्षक पो.स्टे. वेदांतनगर : 9226514031
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सिडको: 9226514032
पोलीस निरीक्षक पो.स्टे. जिन्सी: 9226514033
पोलीस निरीक्षक पो.स्टे. जवाहरनगर : 9226514034
पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम सिडको : 9226514035
पोलीस निरीक्षक पो.स्टे. मुकुंदवाडी: 9226514036
पोलीस निरीक्षक पो.स्टे. उस्मानपुरा: 9226514037
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सातारा: 9226514038
पोलीस निरीक्षक पो.स्टे. हर्सुल: 9226514039
पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुंडलीकनगर : 9226514040
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग 1 : 9226514041
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग 2 : 9226514042
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, सिडको विभाग : 9226514043
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, छावणी विभाग: 9226514044
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, वाळुज विभाग: 9226514045
पोलीस निरीक्षक, दंगा काबू : 9226514046
कोर्ट मॉनटरींग सेल (पैरवी अधिकारी) : 9226514047
पोलीस निरीक्षक, मनपा अतिक्रमण हटाव पथक : 9226514048
पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग : 9226514049
पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग : 9226514050
इतर महत्वाच्या बातम्या: