(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Weather: येत्या 4 दिवसांत मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Marathwada Weather News: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या माहितीनुसार हा अंदाज वर्तविला आहे.
Marathwada Weather News: राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत असून, कधी उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अचानक अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडताना पाहायला मिळतोय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) येत्या 4 दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वारेही वाहू शकेल, असा अंदाज 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. तर प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या माहितीनुसार हा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 27 एप्रिल या चार दिवसांत मराठवाड्यात काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान वादळी वारेही वाहू शकेल, असा अंदाज 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या माहितीनुसार हा अंदाज वर्तवला आहे.
- 24 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
- तर 25 एप्रिल रोजी लातूर, परभणी, बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
- तर 26 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
- तर 27 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
'या' भागात गारपिटीची शक्यता
- तसेच 26 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
- तर २७ एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका
सततच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, जालना, उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील काही भागात या अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे अक्षरशः उन्मळून पडली आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यात आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. सोबतच भाजीपाला पिकालाही अवकाळीचा फटका बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :