एक्स्प्लोर

Farmer Suicide : नवीन वर्षांतील 72 दिवसांत 164 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मराठवाड्यातील विदारक वास्तव

Marathwada Farmer Suicide : एकट्या बीड जिल्ह्यात 72 दिवसात तब्बल 52 शेतकऱ्यांनी आपल आयुष्य संपवलं आहे.

Marathwada Farmer Suicide : सरकार बदलत असले तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा (Farmer Suicide) विषय मात्र कायम आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी पाहता चिंतेचा विषय बनला आहे. कारण मराठवाड्यात नवीन वर्षांतील 72 दिवसांत 164 आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात (Beed District) झाल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 72 दिवसात तब्बल 52 शेतकऱ्यांनी आपल आयुष्य संपवलं आहे. यात नापिकी आणि कर्ज फेडण्याची चिंता हे मुख्य कारण आहे.  

गेल्या तीन ववर्षांपासून मराठवाड्याला सतत अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर सततच्या नापिकी आणि कर्जाच्या चिंतेने अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहेत. ज्यात मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. 2022 मध्ये एकट्या मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर 2023 च्या सुरवातीला देखील मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबताना दिसत नाही. कारण मराठवाड्यात नवीन वर्षांतील72 दिवसांत 164 आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात एका आठवड्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

नवीन 72 दिवसांतील शेतकरी आत्महत्या! 

अ.क्र.  जिल्ह्याचे नाव  आत्महत्या संख्या 
1 छत्रपती संभाजीनगर  16
2 जालना  11
3 परभणी  14
4 हिंगोली  03
5 नांदेड  25
6 बीड  52
7 लातूर  10
8 धाराशिव  32
9 एकूण  163

आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी...

यावर्षी देखील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. कारण सुरुवातीला अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. अतिवृष्टीमुळे तर अनेक ठिकाणी शेतात पंधरा दिवस पाणी साचलेले होते. अशात रब्बीत काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा असताना गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान केले आहे. ज्यात गव्हाचे पीक तर अक्षरशः आडवे पडले होते.  

इतर महत्वाचे बातम्या : 

Farmers Suicide : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याने संपवलं जीवन; आठवड्याभरातील सातवी आत्महत्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: हरियाणा निकालानंतर संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल ते सुद्धा सांगा!
हरियाणा निकालानंतर संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल ते सुद्धा सांगा!
Hyundai IPO: पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
अखेर तारखा जाहीर, गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, ह्युंदाईचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार, कमाईची मोठी संधी
Amravati Crime : तो माझा आहे, तुझ्यामुळेच दुरावा आला! तरुणीकडून मैत्रिणीची सुपर एक्स्प्रेस हायवेवर चाकूने भोसकून हत्या
तो माझा आहे, तुझ्यामुळेच दुरावा आला! तरुणीकडून मैत्रिणीची सुपर एक्स्प्रेस हायवेवर चाकूने भोसकून हत्या
मोठी बातमी : कारमध्ये फाईलआड तोंड लपवून पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या नेत्याचं नाव समोर, अजित पवारांना आणखी एक धक्का!
मोठी बातमी : कारमध्ये फाईलआड तोंड लपवून पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या नेत्याचं नाव समोर, अजित पवारांना आणखी एक धक्का!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं भूमिपूजन, 7,600 कोटींहून अधिक प्रकल्पांची पायाभरणीShivsena Dasara Melava  : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीतीABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024Cooking Chef Smita Abhinay Dev : सुप्रसिध्द पाककला तज्ज्ञ स्मिता अभिनय देव यांची मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: हरियाणा निकालानंतर संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल ते सुद्धा सांगा!
हरियाणा निकालानंतर संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल ते सुद्धा सांगा!
Hyundai IPO: पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
अखेर तारखा जाहीर, गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, ह्युंदाईचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार, कमाईची मोठी संधी
Amravati Crime : तो माझा आहे, तुझ्यामुळेच दुरावा आला! तरुणीकडून मैत्रिणीची सुपर एक्स्प्रेस हायवेवर चाकूने भोसकून हत्या
तो माझा आहे, तुझ्यामुळेच दुरावा आला! तरुणीकडून मैत्रिणीची सुपर एक्स्प्रेस हायवेवर चाकूने भोसकून हत्या
मोठी बातमी : कारमध्ये फाईलआड तोंड लपवून पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या नेत्याचं नाव समोर, अजित पवारांना आणखी एक धक्का!
मोठी बातमी : कारमध्ये फाईलआड तोंड लपवून पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या नेत्याचं नाव समोर, अजित पवारांना आणखी एक धक्का!
Ranjitsinh Mohite Patil: रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ?  मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ? मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
Nagpur News : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरणी सक्त निर्देश
काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरण
Embed widget