(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगरातील गोदावरी नदीत बुडून चौघांचा मृत्यू, वैजापूरच्या पालखेड गावावर शोककळा
Chhatrapati Sambhaji Nagar: प्राथमिक माहितीनुसार एका मुलगा सापडला असून, त्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गोदावरी नदीत गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथे असलेल्या गोदावरी नदीत ही घटना घडली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरु केला होता. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यात चौघांचाही मृत्यू झाला आहे. बाबासाहेब गोरे, नागेश गोरे, आकाश गोरे, शंकर घोडके असे चारही मुलांचे नावं आहेत.
छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रोडवरील कायगाव टोका प्रवरासंगमच्या गोदावरी नदीत चार जण बुडाले आहे. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील हे तरुण आहे. चारही तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान यात्रेहून परत येत असताना गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरले होते. सुरुवातीला दोन जण बुडाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेलं आणखी दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. ज्यात चार तासांनी चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. पण त्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
घटनास्थळी मोठी गर्दी...
कायगाव येथील गोदावरी नदीत चार जण बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरिकांकडून मुलांचा शोध घेण्यात आला. तर याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवण्यात आली. दरम्यान एक-एक करून चार तासात चारही मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर घटनास्थळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी देखील धाव घेत, सर्व घटनेचा आढावा घेतला.
वैजापूरच्या पालखेड गावावर शोककळा
कायगाव येथील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे चारही तरुण वैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील होते. तर चारही तरुण मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. दरम्यान यात्रेहून परत येत असताना गोदावरी नदीत आंघोळीसाठी उतरले होते. सुरुवातीला दोन जण बुडाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेलं आणखी दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेत चारही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालखेड गावावर शोककळा पसरली आहे. तर गावातील अनेकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
GST Raid : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर शहरात जीएसटी विभागाचे छापे; सराफा दुकानावर कारवाई