Breaking News : महाराष्ट्रातील 8 पर्यटक सिक्किमध्ये अडकले; संपर्क होत नसल्याची नातेवाईकांची माहिती
Sikkim Heavy Rain : याची माहिती मिळताच मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून या पर्यटकांशी संपर्क करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
![Breaking News : महाराष्ट्रातील 8 पर्यटक सिक्किमध्ये अडकले; संपर्क होत नसल्याची नातेवाईकांची माहिती Maharashtra 8 tourists got stuck in Sikkim no contact with tourists Breaking News : महाराष्ट्रातील 8 पर्यटक सिक्किमध्ये अडकले; संपर्क होत नसल्याची नातेवाईकांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/c85dd48e0a1c8785e86570f36fdf79181696652049625737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sikkim Heavy Rain : सिक्किमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असतानाच आता महाराष्ट्रातील पर्यटक सिक्कीममध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील आठ पर्यटक सिक्किमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. 29 सप्टेंबरला हे पर्यटक सिक्किमला गेले होते. मात्र, त्यांच्यासोबत संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याची चिंता लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील जैन आणि सहारा कुटुंबीय पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. पहिल्या दिवशी जेव्हा सिक्कीममध्ये पाऊस झाला होता, त्यावेळी त्यांनी सिल्लोड येथील कुटुंबीयांशी संपर्क केला होता. तसेच खूप जोरदार पाऊस होत असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. सिक्कीम येथील श्रीहरी नावाचे एक हॉटेल असून, त्या ठिकाणी हे पर्यटक थांबले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून या पर्यटकांशी संपर्क करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडमधील 8 पर्यटक सिक्कीममध्ये अडकले आहेत. तर, कुणाल सहारे, राजश्री कुणाल सहारे, सर्वांश कुणाल सहारे, साईशा कुणाल सहारे, स्नेश जैन, शीतल जैन, मोक्ष जैन, सिद्धांत जैन असे सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांचे नावं आहेत.
अब्दुल सत्तारांकडून सिक्किम प्रशासनाला पत्र...
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय पातळीवर मदतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी सिक्किम येथील आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तसेच, सिल्लोड येथील 8 पर्यटक तिथे अडकली असून, त्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. सोबतच, अडकलेल्या सर्व पर्यटकांची माहिती देखील सत्तार यांनी आपल्या पत्रात त्यांना दिली आहे.
कुटुंबीयांना चिंता...
सिल्लोड येथील जैन आणि सहारे कुटुंबीय पर्यटनासाठी सिक्कीमला गेले होते. 29 सप्टेंबरला ते तिथे पोहचले होते. दरम्यान, पोहचल्यावर त्यांनी सिल्लोड येथील नातेवाईकांना फोनवरून संपर्क देखील साधला. तसेच, आम्ही व्यवस्थित पोहचलो असून, पण येथे खूप जोरदार पाऊस होत असल्याची माहिती दिली. परंतु, त्यानंतर त्यांच्यासोबत संपर्क तुटला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.सतत संपर्क करण्याच्या प्रयत्न केला जात असून, संपर्क होत नसल्याचे देखील जैन आणि सहारे कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांची चिंता लागली असल्याचे देखील ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)