Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली, आवक सुरूच; पाहा आजची आकडेवारी?
Jayakwadi Dam Water Level Today : आज सकाळी 6 वाजेदरम्यान 20 वीस हजार 600 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Jayakwadi Dam Water Level Today : न्यायालयाच्या आदेशानंतर अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातून अखेर मराठवाड्यातील (Marathwada) जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारपासून हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या 43.67 टक्के एवढा झाला आहे. तर, आज सकाळी 6 वाजेदरम्यान 20 वीस हजार 600 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जायकवाडी धरणातील पाणीसाठा (Jayakwadi Dam Water Level)
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1509.90 फूट
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 460.218 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1686.132 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 948.026 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 43.67 टक्के
- जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 20 600
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 00
- उजवा कालवा विसर्ग : 300 क्युसेक
- डावा कालवा विसर्ग : 00
मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा
- मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2133.918 दलघमी
- मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 98.29 टक्के
- 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 818.86 दलघमी (28.91 टीएमसी)
- 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी
मोठ्या संघर्षानंतर मिळाले पाणी...
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (Godavari Marathwada Irrigation Development Corporation) जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी थेट विरोध केला. त्यामुळे मराठवाड्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलनं झाली. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केले. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने देखील पाणी सोडण्यास स्थगिती दिली नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्याला मोठ्या संघर्षानंतर पाणी मिळाले आहे. विशेष म्हणजे यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, पिकांना जीवनदान मिळणार आहे.
कुठल्या धरणातून किती पाणी
- मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10 टीएमसी
- प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी
- गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) 0.5 टीएमसी
- गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: