Road Accident: विनायकराव ठोंबरे नाईट शिफ्टला कामावार जाताना घात झाला, भरधाव गाडीने.... छ.संभाजीनगरमध्ये हिट अँड रनचा व्हिडीओ
Maharashtra Road Accident: छत्रपती संभाजीनगर येथील अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती रात्रपाळीसाठी कामावर जात असताना भरधाव वेगातील कारने विनायक ठोंबरे यांना उडवले.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज महानगर 2 या परिसरात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. रात्री पावणे अकरा वाजता वसंत विनायकराव ठोंबरे हे नाईट शिफ्टला जात असताना त्यांना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरात धडक (Road Accident) दिली. विनायक ठोंबरे रस्त्याच्या एका बाजूने चालत होते. त्यांच्यामागून एक गाडी येत असल्याचा अंदाज त्यांना होता. मात्र, ही गाडी जवळ आल्यानंतर अचानक तिचा वेग वाढला आणि एका क्षणात कारने विनायक ठोंबरे यांनी हवेत उडवले. या दुर्घटनेत विनायक ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर संबंधित कारचा शोध सुरु केला आहे.
अपघाताचा सीसीटीव्ही समोर येताच पिंपरी चिंचवड पोलिसांना जाग
कल्याणीनगरमधील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती पुण्याच्या हिंजवडी परिसरात घडली होती. मात्र, इतका भीषण अपघात होऊन ही पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नव्हता. अखेर या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला अन 'एबीपी माझा'ने हा प्रकार समोर आणला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांना जाग आली असून आज सकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जखमी आकांक्षा परदेशी या तरुणीला केवळ मुक्का मार लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, पहिल्या दिवशी म्हणजे 23 मे ला गुन्हा दाखल का केला नाही? तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करायची तसदी का घेतली? उपस्थित झालेल्या या प्रश्नांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.
पुण्यात आणखी एक अपघात
पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात बुधवारी भीषण अपघात झाला. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली. या धडकेत महिला जागेवरच मृत्युमुखी पडली. पोलिसांनी या ट्रक चालकाला ताब्यात घेतला आहे.
आणखी वाचा