Corona Cases : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधील आरोग्य विभाग अलर्ट; तातडीची बैठक बोलावली
Coronavirus Update : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department) तातडीने बैठक बोलावत, आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला.
Coronavirus Update : केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची (Corona Cases) संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असून, देशभरातील आरोग्य विभाग देखील अलर्ट झालं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) तातडीने बैठक बोलावत, आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच, संपूर्ण यंत्रसामग्री तयार ठेवण्याची सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
केरळ राज्यात कोविड-19चा नवीन फेरियंट आढळून आलेला आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडीसिनच्या पूर्वतयारी बाचत आढावा घेण्यात आला. तसेच, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल व ईओसो पदमपुरा, सिडको एन-11, सिडको एन-8, नेहरु नगर या कोषित सेंट मध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन घेण्याबाबत आदेश देण्यात आले. या बैठकीत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, डॉ. राठोडकर, सर्व आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी जाणि सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.
बैठकीतील सूचना...
- संशयित रुग्णांची कोविड-19आरटीपीआर चाचणी करुन घ्यावी.
- कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 तसेच साथरोग बाबत सर्व्हेक्षण करुन घ्यावे.
कोविड-19 च्या चाचणी साठी पुरेशा प्रमाणात किट्स उपलब्ध करुन घ्यावे. - मेल्टट्रेन हॉस्पिटल, ईओसी पदमपुरा या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत कोविड-19 चाचणी सुरु ठेवावे.
- कोविड-19च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडीसिन उपलब्ध करुन घेणे बाबत कळविण्यात आले.
- ऑक्सिजन सिलेंडर जे पण रिकामे असतील ते तात्काळ भरुन घेण्याबाबत आदेशित करण्यात आले.
- तसेच सर्व RTPCR (RAT पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची Genome Sequencing साठी RTPCR टेस्ट करणे व RTPCR टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास ते सॅम्पल Genome Sequencing साठी पाठविणे गरजेचे आहे) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे Genome Sequencing करणे सॅम्पल VRDL लॅब घाटी येथे पाठविणे गरजेचे असुन) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे Genome Sequencing बाबत कळविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'हे' करा...
- गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
- खोकताना शिकताना हातरुमाल व कपड्याने तोड झाकून घ्या.
- नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवून काढा.
- खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची कोविड-19 ची लक्षणे आढळून येणाऱ्या बंधित व्यक्तीपासून हातभराच्या अंतरावर राहा.
- पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या.
- धुम्रपान टाळा,
- पुरेशी झोप व विश्रांती घ्या.
'हे' करु नका
- हस्तांदोलन करण्याचे टाळावे
- सार्वजनिक ठिकाणी धुंकू नका.
- आपल्याला कोविड-19ची लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
इतर महत्वाच्या बातम्या: