एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : सकाळी प्रवेश, रात्री थेट उमेदवारी; संभाजीनगरमध्ये एमआयएमला शह देण्यासाठी आंबेडकरांची खेळी

Lok Sabha Election 2024 : संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. 

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान (Afsar Khan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये एमआयएम (MIM) आणि इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे. तसेच, जलील आणि अफसर खान यांच्यातील वाद नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा अफसर खान यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यामुळे जलील यांचा कट्टर विरोधक आणि त्यात मुस्लीम चेहरा रिंगणात उतरवून जलील यांची लढाई आणखी कठीण करण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. 

एमआयएमचा बदला घेणार? 

मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती करण्यात आली होती. युतीमधील सर्वच उमेदवार जिंकून आणण्यासाठी 'वंचित'ने जिवाचे रान केले. मात्र, याचवेळी एमआयएमने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघांत 'वंचित'ला साथ दिली  नसल्याचा आक्षेप प्रकाश आंबेडकरांचे आहे. त्यामुळे राज्यात जलील सोडता एकही उमेदवार निवडून आला नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आणि राज्यातील एमआयएमचा एकमेव खासदाराचा पराभव करण्यासाठी वंचितने अफसर खान सारखा चेहरा शोधून काढल्याची चर्चा आहे. 

अफसर खान यांच्यामुळे जलील यांना किती फटका बसणार?

जलील यांच्या विरोधात वंचितने रिंगणात उतरवलेले अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे जलील यांना किती फटका बसणार याबाबत देखील चर्चा होत आहे. मात्र, अफसर खान आणि जलील यांच्या जनसंपर्काचा विचार केल्यास अफसर खान हे फक्त शहरातील काही भागापुरते मर्यादित चर्चेत असतात. मात्र, खासदार असल्याने जलील यांची मागील पाच वर्षात शहरासह जिल्ह्यात च्नागली पकड निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच, आदर्श बँक घोटाळ्याबाबत त्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सोबतच राजकीय घडामोडीमुळे जलील नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. त्यामुळे अफसर खान यांना जलील यांचा सामना करतांना आणखी जोमाने काम करावे लागणार असल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Road Jail: नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
Sanjay Raut on Ashish Shelar: भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Kelkar VS Sanjay Raut : राऊत जे बोलतात नेमकं त्याचं उलट होतं- संजय केळकर
BJP VS Shivsena Buldana : बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप
Ravindra Dhangekar: Eknath Shinde सुतळी बॉम्बसारखे, चंद्रकांत पाटील कोणत्या फटाकेसारखे?
Sushma Andhare : अंधारेंसोबत फटाक्यांची खरेदी, कोणत्या नेत्याला कोणते फटाके भेट देणार?
Dhanteras 2025: समुद्रमंथनातून प्रकटलेल्या आरोग्य देवतेचे पूजन, Nashik मध्ये विशेष आयोजन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Jail: नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
Sanjay Raut on Ashish Shelar: भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
Pak Vs Afganistan: अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
Nandurbar Accident: मोठी बातमी : ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, महाराष्ट्र सुन्न
मोठी बातमी : ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, महाराष्ट्र सुन्न
Pune News: पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
Embed widget