एकीकडे महायुतीची सभा, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदे गटाचा दावा
Chhatrapati Sambhaji Nagar : एकीकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपकडून (BJP) प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) देखील याच मतदारसंघावर दावा करताना पाहायला मिळत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) कार्यकर्त्यांचा मनोमिलन व्हावं यासाठी आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे लोकसभेची उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार यावर भाष्य करण्यास तिन्ही पक्षाचे नेत्यांनी टाळ्याचं पाहायला मिळालं. मात्र, असे असले तरी या मेळाव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी कन्नड येथील सभेत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केला आहे. एकीकडे या जागेवर भाजपकडून (BJP) प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना देखील याच मतदारसंघावर दावा करताना पाहायला मिळत आहे.
शिवसंपर्क अभियान निमित्ताने कन्नड शहराजवळ आयोजित मेळाव्यात बोलतांना भुमरे म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. त्याची चिंता तुम्ही करू नका. पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उमेदवारास रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आपण देऊ, कन्नड तालुका कायम शिवसेनेसोबत राहिला असल्याचे संदीपान भुमरे म्हणाले.
संभाजीनगर मतदारसंघावर भाजपसह शिंदे गटाचाही दावा...
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागेवर भाजपने देखील दावा केला आहे. त्यासाठी, भाजपकडून नेत्यांकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. या मतदारसंघातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे युतीमध्ये ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. एवढेच नाही तर या जागेवर शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार असल्याचा दावा देखील शिंदे गटाचे नेते करत आहे.
नेतेमंडळी लागले कामाला...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते यासाठी जिल्ह्याचे दौरे करत आहेत. आत्तापासूनच भेटीगाठी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक महत्वाच्या नेत्यांचे शहरातील दौरे देखील वाढले आहेत. तसेच सभा देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना आता अधिकचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
'या' नेत्यांच्या नावाची चर्चा...
आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अनेक नावांची चर्चा आहे. केंदीय मंत्री भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, संदिपान भुमरे, इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'